Home /News /national /

भारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस; अमेरिकेनंतर सर्वाधिक डोस मिळणार आपल्या देशाला

भारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस; अमेरिकेनंतर सर्वाधिक डोस मिळणार आपल्या देशाला

Corona Vaccine ची मोठ्या प्रमाणावर खरेदी अमेरिकाच करणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर उर्वरित जगाला काय राहणार अशी शंका व्यक्त केली जात होती. पण भारताने कोरोना लशीसंदर्भात एक चांगली बातमी दिली आहे.

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : भारतासह जगभरात कोरोना लशीच्या (Corona Vaccine) चाचण्या सुरू आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मॉडर्ना (Moderna) आणि फायझर (Pfizer Vaccine) कंपन्यांनी आपल्या लशीच्या चाचण्या (Clinical human trials) पूर्ण झाल्याचा दावादेखील केला आहे. आता Covid Vaccine च्या खरेदीसाठी देशा-देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भारतात यापैकी किती लशी पोहोचणार आणि कधी हा खरा प्रश्न आहे. लशीसंदर्भात चांगली बातमी अशी की भारताने अगोदरच 150 कोटींहून अधिक लशींचे डोस मिळावेत म्हणून अॅडव्हान्स बुकिंग करत नंबर लावलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लशींची ऑर्डर करणारा भारत हा दुसरा मोठा देश आहे.  वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या या लशींचे डोस खरेदी करण्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताआधी अमेरिका आणि युरोपियन युनियनचा क्रमांक आहे. ड्यूक विद्यापीठाच्या लॉन्च आणि स्केल स्पीडोमीटर इनिशिएटिववर आधारित हा रिपोर्ट आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्थेत अडथळा आणणार्‍या कारणांचा अभ्यास ही संस्था करते. लॉन्च आणि स्केल स्पीडोमीटर इनिशिटिववर आधारित असलेल्या रिपोर्टनुसार, कोविड 19 वॅक्सीन अडव्हान्स मार्केट कमिटमेंट्सनुसार भारत तिसऱ्या क्रमांकावर आणि अमेरिका आणि युरोपिअन युनियन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना लशीसाठी अनेक कंपन्यांनी चाचण्यांनतर त्यांची लस किती प्रभावी ठरली त्याची आकडेवारी जाहीर केली आहे. Pfizer ने आपली लस 95 टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. मॉडर्नाचा रिझल्टसुद्धा 90 टक्क्यांवर आहे. अनेक कंपन्यांनी चाचण्या सकारात्मक आल्याने लस उत्पादन देखील सुरू केलं आहे. अमेरिका सर्वात पुढे भारताने 150 कोटी डोस खरेदी करण्याला पुष्टी दिली आहे. तर युरोपियन युनियनने 120 कोटी डोस तर अमेरिकेने 100 कोटी शॉट्सची ऑर्डर दिली आहे. अमेरिकेने 100 कोटी डोस खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. पण युरोपीय युनियन आणि अमेरिका संभाव्य डोस खरेदी अधिक प्रमाणात करणार असल्याने ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.  तर युरोपीय युनियनने 76 कोटीहून अधिक डोस खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने 150 कोटी संभावित डोस आणि 100 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे अमेरिकेने जवळपास 250 कोटी डोस खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जागतिक महासत्ता असलेला देश एकाचवेळी सर्व नागरिकांना लसीकरण करू शकतो. भारत तयार करत आहे यादी भारत प्राथमिक लसीकरणाची तयारी करत आहे. ज्या नागरिकांना पहिल्यांदा लशीची गरज लागणार आहे त्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लस मिळाल्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राष्ट्रीय विशेषतज्ज्ञांचा समूह काम करत आहे. अमेरिकन औषध उत्पादन कंपन्या फायझर आणि त्यांची जर्मन पार्टनर बायोएनटेक एसई या कंपन्यांनी आपल्या या लशी 95 टक्के प्रभावी असल्याचं म्हटले आहे. ड्यूक विद्यापीठाच्या माहितीनुसर जगभरात आतापर्यंत 800 कोटी डोस ऑर्डर करण्यात आले आहेत. परंतु या लसींचा प्रभाव अजूनही समोर आलेले नसून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय देशांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर केलेल्या लसींमुळे जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे गरीब देशांना लवकर लस उपलब्ध होणार नसल्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या