Home /News /national /

कोरोना संकटात शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा, असाही होतो रोगाचा प्रसार

कोरोना संकटात शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा, असाही होतो रोगाचा प्रसार

शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे या रोगाचा धोका आणखी वाढणार आहे.

    नवी दिल्ली, 07 मे : देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात आला आहे. अशात शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे या रोगाचा धोका आणखी वाढणार आहे. वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूची लागण सांडपाण्याद्वारे देखील होऊ शकते. म्हणून याकडे मुळीच दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यावरण शास्त्रज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यांचे सांडपाणी गटारांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे तो संसर्ग इतर लोकांमध्येदेखील पसरू शकतो. पण या गोष्टीकडे अद्याप कोणीही लक्ष दिलेलं नाही. महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणू बराच काळ कोरोना बाधित व्यक्तींच्या विष्ठामध्ये जिवंत राहतो. यामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. स्टर्लिंग युनिव्हर्सिटी ऑफ स्कॉटलंडच्या अभ्यासात यासंबंधी म्हटलं गेलं आहे. या अभ्यासाचे सह-लेखक रिचर्ड कुलीम यांनी ही माहिती माध्यमांसमोर आणली आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी अशी बातमीही समोर आली होती की, संक्रमित क्षेत्रं ओळखण्यासाठी सांडपाण्याची तपासणी करण्याचा निर्णय संशोधकांनी घेतला आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलं काम सुरू न्यूज 18.com ने काही दिवसांपूर्वी या संदर्भात एक अहवाल देखील प्रकाशित केला होता. अमेरिकेतील वैज्ञानिक कोरोना विषाणूचा संसर्ग ओळखण्यासाठी सांडपाणी तपासणी करतील. कोरोना संक्रमित मलनिःसारण भाग कोणत्या भागात सांडपाण्यात येत आहे हे पाहण्यासाठी संशोधक गटारांची तपासणी करणार आहेत. सांडपाण्यातून मिळणार आवश्यक माहिती कोव्हिड-19 चा प्रसार थांबवण्यासाठी संक्रमण ओळखणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. बर्‍याचदा अशी प्रकरणं येत असतात ज्यात संक्रमित व्यक्तीस त्याला संसर्ग कसा झाला याची काहीच माहिती नसते. सांडपाणी तपासणीद्वारे वैज्ञानिकांना कोरोना संक्रमित रुग्ण कोणत्या भागात आढळून आले आहेत हे कळेल. हे संक्रमित क्षेत्र शोधण्यात देखील मदत होईल. त्यानंतर या सांडपाण्यावर प्रक्रिया करून यातून संसर्ग रोखण्यास मदत होईल. नेदरलँडमध्ये अशा प्रकारे आढळला संसर्ग गेल्या महिन्यात, नेदरलँडच्या वैज्ञानिकांनी सांडपाण्याची तपासणी करून कोरोनाचं संक्रमण शोधून काढलं होतं. यातून त्यांना महत्वाची माहिती मिळाली होती. कारण, ज्या भागात त्यांना संसर्ग आढळला होता तिथे कोरोना संसर्ग पसरल्याची कोणतीही माहिती नव्हती. म्हणजेच सांडपाण्यातून या संसर्गाचा प्रसार झाल्याचं समोर आलं होतं. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या