Home /News /national /

कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात; गेल्या 2 महिन्यात रुग्णांमध्ये मोठी वाढ

कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात; गेल्या 2 महिन्यात रुग्णांमध्ये मोठी वाढ

मात्र त्याचं प्रमाण हे अतिशय सौम्य स्वरुपाचं होतं असं निरिक्षणही नोंदविण्यात आलं आहे.

मात्र त्याचं प्रमाण हे अतिशय सौम्य स्वरुपाचं होतं असं निरिक्षणही नोंदविण्यात आलं आहे.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तुमचे मानसिक आरोग्य चांगले असणं गरजेचे आहे.

    मुंबई, 21 मे : कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये मोठा बदल झाला आहे. लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जनतेला वाटत होतं की 17 मेपर्यंत लॉकडाऊन उठविण्यात येईल. मात्र आता लॉकडाऊन 4.0 मुळे लोक अधिक बैचेन झाले आहेत. परिणामी लोकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनामुळे लोक घरात अडकून पडले आहेत. यादरम्यान दिवस-रात्र सुरू असलेल्या कोरोनासंबंधितच्या बातम्या, व्हिडीओ पाहत आहेत. त्यामुळे ते याचाच विचार करीत असतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सातत्याने नकारात्मक विचार करीत असल्याने त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्यामध्ये खूप राग येणं, झोप न येणं, बैचेन, घबराट आणि चिडचिड करीत आहे. यातून लोकांमध्ये डिप्रेशन वाढत आहे. याबाबत मध्य प्रदेशचे मानसिक आजारांच्या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रामगुलाम राजदान यांचं म्हणणं आहे की, सरकारला याबाबत गांभीर्याने विचार करावयास हवा. अन्यथा लोकांमध्ये भीती वाढून पुढे ही आत्महत्याचंही कारण ठरू शकेल. मानसिक रोग्यांमध्ये सर्वाधित तरुण लॉकडाऊनमुळे गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेले तरुण वर्ग सर्वाधित त्रस्त आहे. त्यांना भविष्याची भीती आहे. आर्थिक मंदीत त्यांची नोकरी राहिल की नाही असाही विचार करण्यात येईल. त्याशिवाय रोजंदारीवर काम करणाऱ्यांमध्येही नैराश्य वाढत आहे. परिणामी इंदूरमधील मेंटल डिसऑर्ड़रमध्ये तब्बल 40 टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे.  केवळ वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याच नाही तर सोशल मीडियावरही या विषयावर विविध चर्चा सुरू आहे. यातुनही चिंता दुणावत आहे. यासाठी इंदूरमध्ये मानसिक चिकित्सालयांनी स्वतंत्र ओपीडी सुरू केली आहे. यामध्ये डॉक्टर लोकांना कोरोनापासून मानसिकदृष्ट्या दूर राहण्यासाठी मदत करतात. यावेळी डॉक्टर त्यांना कोरोनाबाबत विचार करण्यापासून दूर राहण्याच आवाहन करतात. त्याऐवजी वाचन करा, संगीत ऐका, प्रार्थना करा, घरातल्यांशी गप्पा मारा अशी  विविध कामे करण्याचं आवाहन करतात. याशिवाय मानसिक शांततेसाठी प्राणायाम, योगा, व्यायाम करण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या काळात सकारात्मक असणं आवश्यक आहे. कारण नकारात्मक राहिल्याने शरीरातील रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होईल आणि आजाराशी दोन हात करणे अवघड जाईल. संबंधित-...तर पुन्हा सुरू होऊ शकतं सिनेमांचं शूटिंग, CM उद्धव ठाकरेंनी दिले संकेत
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या