Home /News /national /

COVID 19 : सर्व्हे करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकावर चाकू हल्ला, एक जखमी

COVID 19 : सर्व्हे करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकावर चाकू हल्ला, एक जखमी

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

काही स्थानिक लोकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही त्याने हल्ला केला.

    इंदूर 19 एप्रिल: कोरोना व्हायरसविरुद्ध सगळ्यात आघाडीवर लढत आहेत ते डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी. आपला जीव धोक्यात घालून ही मंडळी लोकांचे जीव वाचवत आहेत. मात्र देशातल्या काही भागात डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनाही घडत आहेत. मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं आज सर्व्हेचं काम करणाऱ्या डॉक्टर्सच्या पथकावर एकाने चाकू हल्ला केला. त्यात पथकातल्या एक जण जखमी झाला आहे.  इंदूरमधल्या विनोबा नगरमधली ही घटना आहे. डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी मिळून असलेलं हे पथक सर्व्हेसाठी निघालं होतं. विनोबा नगरमध्ये काही घरांमध्ये विचारपूस सुरू असतानाच एक युवक आला आणि त्याने अचानक चाकूने वार करायला सुरूवात केली. काही स्थानिक लोकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही त्याने हल्ला केला. त्यात एक जण जखमी झाला. या हल्लेखोराची ओळख पटली असून पारस असं त्याचं नाव आहे. तो ड्रग्ज विकणारा असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी करण्यात येत आहे. या आधीही इंदूरमध्येच डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. कोरोना व्हायरस सध्या जगभरातील देशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखताना अमेरिकेसारख्या महासत्तेच्याही नाकी नऊ आले आहेत. अशातच या व्हायरसबद्दल नवी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्ण रोग लक्षणांच्या दोन किंवा तीन दिवस आधी बर्‍याच लोकांना संक्रमित करु शकतात, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोना व्हायरसमुळे ACPचा उपचारादरम्यान मृत्यू नेचर मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, लक्षणे दिसल्यानंतर नियंत्रण उपाय केल्यास रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. मात्र चाचणी होण्याच्या पूर्वीपासून म्हणजे दोन ते तीन दिवसात अनेकांना तो संक्रमीत करीत असेल तर प्रशासनापुढे आव्हान वाढण्याची शक्यता आहे.  हे वाचा - 50 घरांमध्ये दूध विकणाराच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, हजारो लोकांचे जीव धोक्यात हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, संशोधनात असे दिसून आले आहे की जर संसर्गाच्या संपर्कात येण्याची वेळ आणि लक्षणे कमी असतील तर ही लक्षणे दिसण्यापूर्वीच हा संसर्ग पसरतो. चीनच्या गुआंगझोउ येथे रूग्णालयात दाखल झालेल्या 94 रूग्णांच्या व्हायरल शेडिंगच्या तात्विक नमुन्यांचे मूल्यांकन केले गेले. या रूग्णांनी दोन-तीन दिवसांनी कोरोना विषाणूची चिन्हे दर्शविली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या