मराठी बातम्या /बातम्या /देश /

8 जणांच्या दुर्लक्षामुळे तब्बल 5 राज्यांमध्ये पसरला कोरोना, धक्कादायक माहिती

8 जणांच्या दुर्लक्षामुळे तब्बल 5 राज्यांमध्ये पसरला कोरोना, धक्कादायक माहिती

Medical workers in protective suits entering a building under lockdown in downtown Kuala Lumpur, Malaysia, on Tuesday, April 7, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to the public to help curb the spread of the new coronavirus. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Vincent Thian)

निष्काळजीपणाचा मोठा परिणाम झाला असून संसर्गाने एक भयानक रूप धारण केले आहे.

नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. मात्र दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधील आठ जणांच्या दुर्लक्षामुळे जवळपास 1 हजार 917 लोकांना संसर्ग झाला. हे लोक कोरोनाबाधित झाल्यानंतर विलगीकरण कक्षात न जाता सार्वजनिक ठिकाणी फिरत राहिले आणि मोठा अनर्थ झाला. निष्काळजीपणाचा मोठा परिणाम झाला असून संसर्गाने एक भयानक रूप धारण केले आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य असुरक्षित झाले आहे.

प्रत्येकाने सरकारी बंधने व नियम लक्षात घेऊन आपली जबाबदारी पार पाडली असती, तर परिस्थिती एवढी तीव्र नसती. निष्काळजीपणाचा परिणाम असा आहे की कोरोना व्हायरसचा आता देशभरात मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. प्रत्येक जण स्वत:च्या घरात कैद झाला आहे. लॉकडाऊनही वाढ करण्यात आली आहे. मात्र अजूनही काही जण कोरोनाचे वाहक बनूत समाजात फिरत आहेत.

दिल्लीमध्ये तबलिगी जमात संबंधित 1 हजार 650 कोरोना रुग्ण आहेत. निजामुद्दीन भागात 13 ते 15 मार्च या कालावधीत एक सभा आयोजित केली होती. ज्याला अनेक परदेशी नागरिकांनी भेट दिली होती. ही सभा संपल्यानंतर हे लोक देशाच्या विविध भागात पोहचले होते. या लोकांनी सुमारे 1 हजार 650 लोकांना संक्रमित केले. जेव्हा त्यांना संसर्ग झाल्याचे उघड झाले तेव्हा ते रुग्णालयात जाण्याऐवजी लपून बसले आहेत.

मुंबईही एक 65 वर्षीय महिला कॉर्पोरेट कार्यालयांना टिफिन पुरवित होती. नंतर तिला कोरोनाची लागण झाली त्यानंतर टिफिन घेणाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. उत्तर प्रदेशाती नोएडा मधील कंपनीच्या दुर्लक्षामुळे जवळपास 41 लोकांना संसर्ग झाला. कंपनीत पहिला रुग्ण आढळण्यानंतर देखील कंपनीत काम होत राहिले त्यामुळे. कंपनीच्या 13 कर्मचार्‍यांसह त्याच्या कुटुंबातील 11 जणांमध्ये या विषाणूचा शिरकाव झाला.

हेही वाचा- मोदींच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी सांगितला कोरोनाला हरवण्याचा मार्ग, पण व्यक्त केली 'ही' भीती

24 जणांच्या संक्रमणानंतर जिल्हा प्रशासनाने कंपनीला सील ठोकले. नोएडामध्ये जे कोरोना रुग्ण समोर येत आहेत त्यांचे मूळ कारण म्हणजे हीच सिजफायर कंपनी आहे. देशात असे अनेक उदाहरण आहेत . राजस्थान,उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश असे अनेक राज्यातील उदाहरण देता येईल. मात्र या काही लोकांच्या चुकीचा परिणाम संपूर्ण देश सहन करत आहे.

First published:

Tags: Coronavirus