शेअर बाजाराला कोरोनाचा फटका, निफ्टीमध्ये गेल्या 11 वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

शेअर बाजाराला कोरोनाचा फटका, निफ्टीमध्ये गेल्या 11 वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

कोरोना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारावर झाल असून या आठवड्याच निफ्टी तब्बल ७.१ टक्क्यांनी पडला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : शेअर बाजारातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. शेअर मार्केटलाही कोरोनाची लागण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे रोखे बाजाराला घरघर लागली असून आज सेन्सेक्स तब्बल 1200 अंकानी पडला आहे. तेलाच्या किमतीही आज सहाव्या दिवशी घसरल्या आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला असून जागतिक बाजारात मागणी कमी झाल्यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

निफ्टीमध्ये गेल्या 11 वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक पडझड मानली जात आहे. या आठवड्याच निफ्टी तब्बल ७.१ टक्क्यांनी पडला आहे. आज सकाळी आलेल्या माहितीनुसार, निफ्टी तब्बल 300 अंकानी पडला आहे. तर काही मिनिटांतच तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा फटका शेअर मार्केटला सहन करावा लागला आहे. हे अंत्यंत चिंताजनक असून यावर उपाय योजना आणणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्यानंतर सेन्सेक्स पुन्हा उभारी घेईल असे मत शेअरबाजार तज्ज्ञ शशांक रानवे यांनी सांगितले.

जगातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीवर कोरोना व्हायरस विळख्याचा परिणाम होताना दिसत आहे. ही बाब गंभीर आहे. कोरोना व्हायरसचा फटका इटली, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनाही होत आहे. कोरोना हा आता युरोप पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्योग क्षेत्रांवर होताना दिसत आहे. परिणामी शेअर मार्केट ढासळला आहे. ही घसरण फक्त भारतात नसून संपूर्ण जगभरातील बाजारांमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे, अशी माहिती परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 1200 अंकाची घसरण झाली असून सेन्सेक्स सत्रअखेर 143.30 अंश घसरणीसह 39,745.66 पातळीवर स्थिरावला. आज सकाळी सेन्सेक्समध्ये 38,600 अंकापर्यंत घसरण झाली. परिणामी टाटा स्टील, टाटा महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये ५.३१ टक्क्यांची घसरण झाली. यामुळे काही मिनिटांमध्ये गुंतवणुकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - तुम्हाला किती कर द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम

First published: February 28, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading