Home /News /national /

कोरोनामुळे पतीची छुपी बँकॉक ट्रिप झाली उघड, अचानक पोलीस घरी आल्याने पत्नी झाली हैराण

कोरोनामुळे पतीची छुपी बँकॉक ट्रिप झाली उघड, अचानक पोलीस घरी आल्याने पत्नी झाली हैराण

परदेश प्रवास करणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून येण्याचं प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांकडून त्यांना क्वारंटाइनची सूचना दिली जात आहे

    नवी दिल्ली, 31 मार्च : देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. मात्र यादरम्यान परदेश दौरा केलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. अशाच व्यक्तींची कोरोना तपासणीमुळे त्यांच्या कुटुंबात वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका ट्विटर युजरने यासंदर्भात ट्विट केलं आहे. जे सध्या बरंच व्हायरल झालं आहे. या ट्विटसह अभिजीतने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही पोलीसही दिसत आहेत. या ट्विटमध्ये लिहिल्यानुसार, दोन व्यक्ती आपल्या पत्नीला बंगळुरुला जात असल्याचे सांगून बँकॉकला रवाना झाले. दोघे घरी आल्यानंतर काही दिवसांत पोलीस त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरासमोर क्वारंटाइनची नोटीस लावली. यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा ट्रॅव्हल रेकॉर्ड पाहिला होता. मात्र घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला यासंदर्भात माहिती नव्हती. त्यावेळी पोलिसांनी दोघांना क्वारंटाइन करण्यामागचे कारण सांगितले. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर दोघांच्या पत्नींना आपला पती खोटं बोलून बँकॉकला गेल्याची माहिती मिळाली. हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. मात्र आता लोकांमध्ये उत्सुकता आहे की पतीचं खोटं समोर आल्यानंतर पत्नीने त्यांच्यासोबत काय केलं असेल. अशा अशायाचे रिप्लाय त्यांच्या ट्विटरवर येत आहे. परदेश प्रवास करणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून येण्याचं प्रमाण अधिक असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. संबंधित -बापाला डोक्यात गोळ्या घालून संपवलं, 3 दिवसांनी मुलाचाही झाला मृत्यू
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या