एकदा कोरोना होऊन गेलाय? मग 8 महिने तरी पुन्हा होण्याची शक्यता नाही!

एकदा कोरोना होऊन गेलाय? मग 8 महिने तरी पुन्हा होण्याची शक्यता नाही!

एकदा Coronavirus चा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींमधल्या अँटीबॉडीज झपाट्याने कमी होत जात असल्याचा निष्कर्ष काही संशोधनांतून (Research) निघाला होता; मात्र त्यावर या नव्या संशोधनातून उत्तर मिळालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी :एकदा कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) होऊन गेल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार झालेल्या प्रतिपिंडांमुळे (Antobodies) त्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आठ महिन्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं, असा दावा एका नव्या संशोधनानंतर करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लस (Vaccine) तयार करणाऱ्या कंपन्यांच्या दृष्टीनेही ही चांगली बातमी असून, लशीद्वारे शरीरात सोडलेल्या अँटीबॉडीजमुळेही कोरोनापासून दीर्घ काळ संरक्षण मिळू शकेल, असं आरोग्यतज्ज्ञांना वाटतं आहे.

एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्यांना पुन्हा कोरोना होण्यापासून संरक्षण मिळण्याचा कालावधी जास्तीत जास्त तीन ते पाच महिन्यांचा असू शकतो, असा समज आतापर्यंत वैद्यकीय वर्तुळात होता. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपर्यंत संरक्षण मिळण्याची शक्यता जाहीर होणं, ही मोठी गोष्ट आहे. पश्चिम दिल्लीतल्या बीएलके हॉस्पिटलमधल्या उरोरोग आणि श्वसन रोग विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक संदीप नायर यांनी सांगितलं, की 'या बातमीमुळे लसनिर्मिती करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भयंकर रोगाला प्रतिकार करणाऱ्या लशी तयार झाल्या, की त्या दीर्घ काळपर्यंत संरक्षण देऊ शकतील, अशी आशा या संशोधनामुळे निर्माण झाली आहे.'

'धनंजय मुंडेंनाच नव्हे तिने मलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला' : तिसरा धक्का

हे नवं संशोधन अमेरिकेत झालं. कोविड-19मधून बऱ्या झालेल्या पेशंटच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यातील अँटीबॉडीज, मेमरी बी सेल्स, हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स यांची संख्या मोजण्यात आली. संशोधनातून असं निरीक्षण नोंदवण्यात आलं, की विशिष्ट रोगकारक घटकाला प्रतिकार करण्याची आपोआप कार्यान्वित होणारी यंत्रणा (Adaptive Immune System) पहिल्या संसर्गानंतर आठ महिन्यांपर्यंत टिकू शकते.

'टी सेल्समुळे प्रतिकारशक्ती तयार होते आणि त्यामुळे अँटीबॉडीज मेमरी बी सेल्सची निर्मिती करू शकतात. त्याद्वारे कोविड-19पासून (गंभीर रुग्णांमध्ये) संरक्षण मिळू शकतं,' असं 'मेदान्ता- द मेडिसिटी'मधील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ नेहा गुप्ता यांनी सांगितलं.

गुरुग्राममधल्या फॉर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या न्यूरॉलॉजी  विभागाचे प्रमुख प्रवीण गुप्ता यांनी सांगितलं, की 'कोविड-19मधून पेशंट बरे होण्याचा जास्तीत जास्त अनुभव येत जाईल, तसतसं त्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीजवर लक्ष ठेवता येईल. सहा महिने किंवा काही पेशंटमध्ये एका वर्षापर्यंतही ही प्रतिकारशक्ती टिकून राहू शकते.'

कोंबड्यांची टेस्ट निगेटिव्ह तरीही चिकन झालं कवडीमोल; फुकट विकण्याची आली वेळ 

एकदा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींमधल्या अँटीबॉडीज झपाट्याने कमी होत जात असल्याचा निष्कर्ष काही संशोधनांतून (Research) निघाला होता; मात्र त्यावर या संशोधनातून उत्तर मिळालं आहे. कोविड-19मधून बऱ्या झालेल्या जवळपास सर्वच पेशंटमध्ये आवश्यक त्या प्रतिकारक पेशी तयार झालेल्या आहेत, असं नवं संशोधन सांगतं.

या संशोधनात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञ डॅनिएला वेस्कॉफ यांनी सांगितलं, की 'लशींचा अभ्यास अद्याप प्राथमिक स्तरावर आहे; मात्र लशीमधून तयार करण्यात आलेली प्रतिकारशक्तीही एवढाच काळ टिकू शकेल, असं संशोधनातून पुढे येईल, अशी आशा आहे.'

भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत 0.7 टक्के लोकसंख्येलाच कोविड-19चा संसर्ग झाला आहे. तसंच, हा संसर्ग काही राज्यं आणि शहरांत अधिक केंद्रित आहे. कोविड-19 आपल्या देशात खूप जास्त पसरला नाही आणि मृत्युदरही तुलनेने कमी आहे, याचा अर्थ असा, की विकसित देशांच्या तुलनेत भारतीयांकडे कोविड-19साठीची अधिक प्रतिकारशक्ती आहे, असं मत गुप्ता यांनी व्यक्त केलं.

First published: January 14, 2021, 11:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading