राष्ट्रपती भवनात तैनात पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाईन

राष्ट्रपती भवनात तैनात पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाईन

देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे : दिल्ली पोलिसांच्या जवानांना सातत्याने कोरोनाची (Coronavirus) लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारीही राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांचे एसीपी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे तैनात असलेल्या एसपी यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीही एक महिला एसीपी यादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या ऑफिसात तैनात असलेल्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

राष्ट्रपती भवनात तैनात होते एसीपी

दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि जवानांमधील कोरोना फैलाव सातत्याने वाढत आहे. गेल्या 1 महिन्यात दिल्ली पोलिसांचे तब्बल 200 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. कोविड – 19 च्या आजारात आतापर्यंत 100 जवानांची तब्येत बरी झाली आहे. संक्रमण झाल्यानंतर बरे झालेले जवान सध्या डिस्चार्ज झाले असून होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर दुसरीकडे देशभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 31 मेपर्यंत लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला आहे. यासाठी गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाउनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरू होईल आणि लोकांना अधिक सवलत आणि सूट मिळेल. केंद्र सरकारने जारी केलेल्या तत्त्वांमध्ये मेट्रो, विमान सेवा बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळं, धार्मिक कार्यक्रम, हॉटेल्स आणि सिनेमाहॉल त्याचबरोबर जीम बंददेखील बंदच राहणार आहे. तर रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. राज्य सरकार आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार झोनचा निर्णय घेणार आहे.

संबंधित -Breaking कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन

First published: May 17, 2020, 7:46 PM IST

ताज्या बातम्या