कोरोना रुग्णाने ऑर्डर केली चिकन तंदुरी बिर्याणी; चक्क वॉर्डपर्यंत आला डिलिव्हरी बॉय

कोरोना रुग्णाने ऑर्डर केली चिकन तंदुरी बिर्याणी; चक्क वॉर्डपर्यंत आला डिलिव्हरी बॉय

डिलिव्हरी बॉय लोकेशन फॉलो करीत कोविड रुग्णांच्या वॉर्डजवळ आला आणि...

  • Share this:

सलेम, 21 मे : तामिळनाडूमधील सलेम सरकारी मोहन कुमारमंगलम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमित रुग्णांना केवळ शाकाहारी अन्न दिलं जात आहे. मंगळवारी सायंकाळी यापैकी 4 जणांना मांसाहारी अन्न खाण्याची इच्छा झाली. त्यांनी एका फूड डिलिव्हरी अपवर (Food Delivery App) तंदुरी चिकन आणि बिर्याणीची ऑर्डर केली आणि आपल्या ऑर्डरची वाट पाहू लागले.

विशेष म्हणजे ऑर्डर एक्सेप्ट झाली...अन्न तयार झाल...आणि एक डिलिव्हरी बॉयने चिकन तंदुरी आणि बिर्याणी तत्सम दुकानातून घेतली आणि लोकेशनच्या दिशेने निघाला.

थोड्या वेळातच तो SGMKMCH पोहोचला. त्या डिलिव्हरी बॉयला दिसत असलेल्या लोकेशननुसार त्याला कोविड – 19 च्या आयसोलेशन वॉर्डमध्ये जायचे होते. जेथून खाण्याची ऑर्डर करण्यात आली होती. कोविड – 19 आयसोलेशन वॉर्डमध्ये जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला सुरक्षारक्षकाने हटकल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या अधिष्ठातांना सांगण्यात आली.

यावर डिलिव्हरी बॉय म्हणाला की त्याला ही ऑर्डर कोविड रुग्णाने केल्याचे माहित नव्हते. शिवाय ही ऑर्डर क्वारंटाईन सेंटरमध्ये करायची असल्याचेही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी कोविड रुग्णांकडे याबाबत चौकशी केली. शेवटी चौघांनी आपण ऑर्डर केल्याचा खुलासा केला. त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णालयात असताना केवळ शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला दिला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना केवळ शाकाहारी प्रोटीनयुक्त भोजन करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर डिलिव्हरी बॉय रुग्णालयातून बाहेर गेला.

हे वाचा -700 किमीचा पायी प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी IPS अधिकारी झाली अन्नपूर्णा

मुंबईहून परतलेल्या तरुणींचा बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ

Lockdown मध्ये भूतदया! साथ देणाऱ्या मुक्या प्राण्याची वृद्ध महिला घेतेय काळजी

 

First published: May 21, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या