Home /News /national /

रुग्णालयाच्या खाटेवरुन पडला कोरोना रुग्ण, ऑक्सिजन सप्लाय बंद झाल्याने तडफडतचं सोडले प्राण

रुग्णालयाच्या खाटेवरुन पडला कोरोना रुग्ण, ऑक्सिजन सप्लाय बंद झाल्याने तडफडतचं सोडले प्राण

रुग्ण खाटेवरुन खाली पडल्यानंतरही कोणीच त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही....

    हैद्राबाद, 27 जुलै : तेलंगणाच्या करीमनगर सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणामुळे एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार करीमनगरमध्ये एका सरकारी रुग्णालयात एक वृद्ध रुग्ण रविवारी खाटेवरुन खाली पडला. आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. सांगितले जात आहे की खाटेवरुन खाली पडल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी कोणीच आलं नाही. रुग्णाला 22 जुलै रोजी दाखल करण्यात आलं होतं. 70 वर्षीय रुग्ण गंगाधारा मंडल येथील वैकटैयापल्ली येथे राहणारे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ज्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. रविवारी रुग्ण खाटेवरुन खाली पडल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन सप्लाय बंद झाला यातचं त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा-रुग्णवाहिका आलीच नाही, कोरोनाबाधित पोलिसाने रात्रभर ड्युटी केली अन् सकाळी... त्या वॉर्डातील अन्य रुग्णांनी सांगितले की रुग्ण बेडवरुन खाली पडल्याची माहिती तातडीने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र कोणीच पुढे येत नव्हतं. श्वास घेता येत नसल्याने ते वृद्ध तडफडत होते. मात्र संसर्गाच्या भीतीने दुसऱंही कोणी पुढे आलं नाही. हे वाचा-देशात कोरोना रुग्णांनी पार केला 14 लाखांचा टप्पा, 32 हजार जणांचा मृत्यू या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. यानंतर कोरोनामुळे माणुसकी मेली का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोनाच्या कहरात वारंवार अशा निष्काळजीपणाच्या घटना समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे एका माणसाचा जीव गेला. ही अत्यंत चीड आणणारी घटना आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या