मराठी बातम्या /बातम्या /देश /

महाराष्ट्रानंतर राजधानी दिल्लीत Omicron च्या रुग्णांमध्ये वाढ, देशभरातील रुग्णांची संख्या 45 वर

महाराष्ट्रानंतर राजधानी दिल्लीत Omicron च्या रुग्णांमध्ये वाढ, देशभरातील रुग्णांची संख्या 45 वर

देशासोबतच राजधानी दिल्लीतही (Delhi) कोरोनाच्या (Corona Virus)  ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे.

देशासोबतच राजधानी दिल्लीतही (Delhi) कोरोनाच्या (Corona Virus) ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे.

देशासोबतच राजधानी दिल्लीतही (Delhi) कोरोनाच्या (Corona Virus) ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 14 डिसेंबर: देशासोबतच राजधानी दिल्लीतही (Delhi) कोरोनाच्या (Corona Virus) ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron variant) चार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची सहा प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सहापैकी एक रुग्ण बरा झाला आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 45 रुग्ण आढळले आहेत.

राजधानी दिल्लीसह देशातील परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर 8 राज्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेश आणि चंदीगडचाही समावेश आहे.

राज्य ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या

महाराष्ट्र - 20

राजस्थान- 09

दिल्ली- 06

कर्नाटक- 03

गुजरात- 04

केरळ- 01

आंध्र प्रदेश- 01

चंदीगड- 01

निम्म्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्र

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहेत. सोमवारी कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले. त्यापैकी एक लातूरचा तर एक पुण्याचा आहे. अशा स्थितीत आता राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 20 झाली आहे. देशात ओमाक्रॉनची 38 प्रकरणे होती, आता दोन नवीन रुग्णांसह ही संख्या 40 झाली आहे.

हेही वाचा- भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं इंडोनेशिया, त्सुनामीचाही इशारा; भीतीचं वातावरण

त्याचवेळी राज्यात 24 तासांत कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळून आले असून 498 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. यासह 5 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आता राज्यात कोरोनाचे 6,507 सक्रिय रुग्ण आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. रविवारी नागपुरात एक तर मुंबईत तीन रुग्ण सापडले होते.

ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

Omicron व्हेरिएंटची एकूण 45 प्रकरणे देशभरात आहेत आणि 20 प्रकरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत. अशाप्रकारे देशातील ओमायक्रॉन प्रकारातील निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा बालेकिल्ला बनेल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. यापूर्वी दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणाऱ्या डेल्टा प्रकारातील सुमारे निम्मी प्रकरणे अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातून येत होती. एवढेच नाही तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात Omicron ची एंट्री

राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले. यामध्ये एक जण हा लातूर येथील प्रवासी आहे. तर एक रुग्ण पुण्यातला आहे. या दोन्ही प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. तर डोंबिवलीमध्ये आढळलेला पहिला रुग्ण हा ओमायक्रॉन मुक्त झाला आहे.

हेही वाचा- ग्राहकांच्या खिशाला चाप..! गोकुळची दूध दरवाढ, असे असतील नवे दर

तर रविवारी नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता. तेव्हा या व्यक्तीचा कोविड चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर जीनोम सिक्वेन्सीसाठी रुग्णाचा अहवाल पाठवण्यात आला होता. आज त्या रुग्णाचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी माहिती पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिली.

ब्रिटनमध्ये पहिल्या रुग्णाचा मृत्यू

दरम्यान, ब्रिटनमध्ये Omicron ची लागण झालेला पहिला रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. (UK reports first death with Omicron variant) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या देशात एप्रिलपर्यंत 75 हजार कोरोना मृत्यू होतील, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. आयएएनएसच्या (IANS) बातमीनुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (LSSTM) आणि दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी इंग्लंड सरकारला इशारा दिला आहे, की देशात कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या 5 महिन्यांत म्हणजे एप्रिल 2022पर्यंत इंग्लंडमध्ये 25 हजार ते 75 हजार नागरिकांचा मृत्यू (Deaths) होऊ शकतो.

First published:

Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus