अलर्ट! भारतामध्ये झपाट्यानं पसरतोय नवा कोरोना, 20 जणांना लागण

अलर्ट! भारतामध्ये झपाट्यानं पसरतोय नवा कोरोना, 20 जणांना लागण

ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New COVID-19 strain) आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर :  कोरोना महामारीचा (Coronavirus Pandemic) चा सामना करणाऱ्या देशातील आरोग्य यंत्रणेसमोर आता आणखी एक गंभीर आव्हान निर्माण झालं आहे. ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New COVID-19 strain) आता भारतामध्येही झपाट्यानं पसरत आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 जणांपैकी 8 जण हे दिल्लीमधील आहेत.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये 2 वर्षांच्या मुलीला मंगळवारी या विषाणूचा संसर्ग झाल्याचं उघड झालं होतं. ब्रिटनमधून आलेल्या सर्व नागरिकांची जीनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) च्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे.

मंगळवारी NCDC दिल्लीमध्ये 14, कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये 7, NIV पुणे इथं 50 निमहंसमध्ये 15, IIGB मध्ये 6 सह एकूण 107 सॅम्पलची तपासणी झाली.यामध्ये दिल्लीमध्ये 8 कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये 1 निमहंसमध्ये 2, NIV पुणे इथं 7 आणि अन्य दोन लॅबमध्ये 2 जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

हे वाचा-या बँकेने महिलांसाठी आणल्या आहेत खास स्कीम, व्यवसाय सुरू करून मिळवा चांगली कमाई

‘घाबरण्याची गरज नाही’

देशभरातून गेल्या महिनाभरात 30 हजार पेक्षा जास्त जण ब्रिटनमधून भारतामध्ये परतले आहेत. या सर्वांची सध्या चाचणी करण्यात येत आहे. यामधील 100 पेक्षा जास्त जणांमध्ये कोव्हिड-19 (Covid-19) ची लक्षणं आढळली आहेत. या सर्वांना सध्या विलिगिकरणात (Isolation) ठेवण्यात आले असून त्यांच्यात प्रकृतीकडे आरोग्य यंत्रणांचं लक्ष आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोनावरील औषध (Co-vaccine) नव्या कोरोना विषाणूवरही परिणामकारक आहे, त्यामुळे घाबरण्याची कोणतीही गरज नाही. ‘ आम्ही परिस्थितीवर करडी नजर ठेऊन आहोत. सावधगिरी अजून वाढवणं, संसर्ग रोखणं, तपासणी वाढवणं आणि नमुन्यांना प्रयोगशाळेत पाठवणं या गोष्टींसाठी राज्यांना सतत मार्गदर्शन देणं सुरू आहे,’ असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

काय काळजी घ्यावी?

सर्वात आधी ब्रिटनमध्ये सापडलेलं विषाणूचं नवं स्वरूप आता डेन्मार्क, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूरमध्येही सापडलं आहे.

या विषाणूची लक्षणं दिसली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सध्या आपण करू शकतो. त्याव्यतिरिक्त सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क वापरणं, हात सॅनिटाइझ करणं आणि कोविड-19 रोखण्यासाठी केलेले इतर उपाय करत राहणं आपल्या हातात आहे.

Published by: News18 Desk
First published: December 30, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या