मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तबलिगी जमातीच्या 51 जणांना शिक्षा

कोरोना काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तबलिगी जमातीच्या 51 जणांना शिक्षा

लॉकडाऊन काळात अनेकांकडून नियमांचं पालन करताना हलगर्जीपणा झाला आणि त्यांना कारवाईचा सामना करावा लागला.

लॉकडाऊन काळात अनेकांकडून नियमांचं पालन करताना हलगर्जीपणा झाला आणि त्यांना कारवाईचा सामना करावा लागला.

लॉकडाऊन काळात अनेकांकडून नियमांचं पालन करताना हलगर्जीपणा झाला आणि त्यांना कारवाईचा सामना करावा लागला.

  • Published by:  Meenal Gangurde
अजित सिंह, लखनऊ, 25 फेब्रुवारी : कोरोनोला रोखण्यासाठी भारतात सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊन काळात अनेकांकडून नियमांचं पालन करताना हलगर्जीपणा झाला आणि त्यांना कारवाईचा सामना करावा लागला. परदेशातील तबलिगी जमातीच्या बाबतही असंच घडलं. कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनदरम्यान गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्याचा आरोपानंतर आता 51 जणांना कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे. कोरोनाच्या महासाथीत केंद्र आणि राज्य सरकारनं कठोर निर्बंध लागू केले होते. तरीदेखील तबलिगी जमातीचे परदेशातील हे लोक देशभर फिरले. यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप झाला. हे वाचामाजी अर्थमंत्र्यांच्या बहीण-भाऊजीच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचाही मृत्यू या आरोपींविरोधात बहराइच, सीतापूर ,भदोही आणि लखनऊमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व लोक थाइलँड, किर्गिस्तान, कजाकिस्तान,बांग्लादेशातील निवासी आहेत. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत सीजेएम कोर्टात सुनावणी झाली. तब्बल 51 आरोपींना कोर्टाकडून शिक्षा ठोठावली गेली आहे. काय आहे तबलिगी जमात? कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला. तबलिगी जमातीची सुरुवात 1926 मध्ये मेवात प्रांतात झाली. या जमातीची स्थापना मौलाना मुहम्मद इलियास यांनी केली होती. या जमातीचं मुख्य काम हे संपूर्ण जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणं हे आहे. हे वाचा - फक्त 5 जिल्ह्यांनी वाढवलं टेन्शन; झपाट्याने वाढले राज्यातील कोरोना रुग्ण या जमातीचं मुख्यालय अर्थात हेडक्वार्टर ‘बंगलेवाली मस्जिद’ जिला निजामुद्दीन मर्कझ म्हटलं जातं या ठिकाणी आहे. हे त्यांचं ग्लोबल सेंटर आहे. जगातल्या 150 देशात या जामातीचे लोक राहतात. 15 ते 25 कोटी लोक या जमातीचं आचरण करतात.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या