Home /News /national /

Corona Latest Update - देशभरात 19 राज्य पूर्णतः लॉकडाउन

Corona Latest Update - देशभरात 19 राज्य पूर्णतः लॉकडाउन

Mumbai: Passenger wearing mask amid coronavirus outbreak is seen at International Airport in Mumbai, Friday, March 20, 2020. (PTI Photo)(PTI20-03-2020_000256B)

Mumbai: Passenger wearing mask amid coronavirus outbreak is seen at International Airport in Mumbai, Friday, March 20, 2020. (PTI Photo)(PTI20-03-2020_000256B)

देशभरात 19 राज्यांमध्ये लॉकडाउची परिस्थिती आहे. आणखी 6 राज्यांमध्ये अंशतः लॉकडाउनची परिस्थिती आहे.

    नवी दिल्ली, 23 मार्च : देशभरातल्या Coronavirus च्या परिस्थितीची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतो आहे. आतापर्यंत देशात 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात 19 राज्यांमध्ये लॉकडाउची परिस्थिती आहे. आणखी 6 राज्यांमध्ये अंशतः लॉकडाउनची परिस्थिती आहे. ICMR चे संचालक बलराम भार्गव म्हणाले, "देशभरात 12 लॅबोरेटरीजच्या चेन Coronavirus ची चाचणी करण्याचं काम करत आहेत. देशभरात या 12 लॅबची 15000 कलेक्शन सेंटर आहेत. भारतासाठी (India) उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus) दुसऱ्या टप्प्यातून (second stage) तिसऱ्या टप्प्यात (third stage) तर पोहोचला नाही ना? याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) निकाल देणार आहे. ICMR चे डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी मॅथेमेटिकल मॉडेलवर काम सुरू असून, मंगळवारी त्याचा निकाल येईल असं सांगितलं आहे. Corona Virus : ...आता गय नाही,अजित पवारांनी दिला आणखी कठोर निर्णय घेण्याचा इशारा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या