'कोरोना नैसर्गिक नाही तर लॅबमध्ये तयार केलाय', केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे मोठे वक्तव्य

'कोरोना नैसर्गिक नाही तर लॅबमध्ये तयार केलाय', केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे मोठे वक्तव्य

कोरोना व्हायरस चीनने पसरवल्याचा आरोप आतापर्यंत अमेरिकेसह अनेक देशांनी केला असताना भारताचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : कोरोना व्हायरसबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही तर लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचं गडकरी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं. नितिन गडकरी म्हणाले की, सध्या आम्ही कोरोना व्हायरससह आर्थिक लढाई लढत आहेत. भारत गरीब देश असून महिन्या दरमहिन्याला लॉकडाऊन वाढवू शकत नाही. आम्हाला सुरक्षेच्या उपायांसह बाजार खुले करावे लागतील.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत नितिन गडकरी म्हणाले की, अमेरिका, ब्रिटन, इटली सारख्या देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित स्थितीत दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण खूप कमी प्रमाणात आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबद्दल गडकरी म्हणाले की, याचा निर्णय फक्त माझ्या मंत्रालयाकडे नाही. मी याबाबत सकारात्म आहे आणि आशा आहे. उद्योग क्षेत्रात त्यांच्या कामगारांना खाण्याची आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. या संकटात सकारात्मक राहणं आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याचं आव्हान असेल.

हे वाचा : कोरोनाव्हायरसमुळे कसा होतो रुग्णांचा मृत्यू? शास्त्रज्ञांना सापडलं मोठं कारण

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 75 हजारांवर पोहोचली आहे. यामुळे आतापर्यंत 2415 जणांचा मृत्यू झाला असून 24386 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याखालोखाल गुजरात, तामिळनाडू आणि दिल्लीत रुग्णांची संख्या जास्त आहे.

हे वाचा : राज्यात Lockdown 4.0 अटळ; आरोग्यमंत्र्यांनी दिला रुग्णवाढीचा इशारा! हे आहे कारण

First published: May 14, 2020, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading