भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कर्मचाऱ्यांसह 75 नेत्यांना संसर्ग

भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कर्मचाऱ्यांसह 75 नेत्यांना संसर्ग

भाजप कार्यालय सील करण्यात आलं असून सध्या सॅनिटाईझ करण्याच काम सुरू आहे

  • Share this:

पाटना, 14 जुलै : देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बिहारमध्येही कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय झाली आहे.

बिहार भाजप कार्यालयातील कर्मचार्‍यांसह 75 नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या लोकांचा चाचणी अहवाल आज आला आहे. काल, सुमारे 100 नेत्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यानंतर भाजपा कार्यालय सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. बिहारमधील एकूण रुग्णांची संख्या 18 हजारांच्या जवळ आहे. या आजारामुळे आतापर्यंत 160 लोक मरण पावले आहेत.

आतापर्यंत 12 हजार 317 लोक बरे झाले आहेत ही दिलासाची बाब आहे. राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 5482 आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या अग्रणी नेत्यांमध्ये संघटनेचे सरचिटणीस नागेंद्र आणि प्रदेश सरचिटणीस देवेश कुमार यांचा समावेश आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश वर्मा आणि माजी एमएलसी राधा मोहन शर्मा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. राज्य भाजपा मुख्यालयात कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्य़ांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

हे वाचा-अमिताभ आणि रेखांनंतर झोया अख्तरचाही बंगला केला सील; BMC ने लावला पोस्टर

पक्षाचे नेते व कर्मचार्‍यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भाजप कार्यालय सील केले केले. प्रशासनाने बीरचंद पटेल मार्गावरील भाजपा कार्यालयाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले. जिल्हा प्रशासन लवकरच भाजप कार्यालय सॅनिटाईझ करण्यास सुरुवात करणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 14, 2020, 4:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading