बँक लॉकरमध्ये ठेवलं होतं सोनं, काढायला गेला तेव्हा निघाले दगड

बँक लॉकरमध्ये ठेवलं होतं सोनं, काढायला गेला तेव्हा निघाले दगड

5 वर्षांपूर्वी बँकेच्या लॉकरमध्येे ठेवलं होतं सोनं. लॉकडाऊमध्ये काढायला गेले आणि निघाले दगड, वाचा काय आहे प्रकरण.

  • Share this:

जालौर, 17 मे : आपण सोनं अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवायचं म्हणून ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. पण विचार करा काही वर्षांनी हे सोनं बँकेतून काढायला गेलात आणि तुमच्या हाती दगड लागले तर? ही काल्पनिक नाही तर प्रत्यक्षात घटना घडली आहे. राजस्थानमधील जालौर जिल्ह्यात अजब प्रकार समोर आला. एका व्यक्तीनं 5 वर्षांपूर्वी सोनं सुरक्षित राहावं म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं. जेव्हा लॉकर उघडला तेव्हा त्याला सोन्याच्या दागिन्यांऐवजी दगड दिसले.

SBI बँकेत आश्चर्यचकीत करणारा हा प्रकार उघडकीस आला आहे. जलौर शहरात राहणाऱ्या परसमल जैन यांनी बँकेत सोनं ठेवलं होतं. या सोन्याचे दगड झाल्याचं पाहून त्यांचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसेना. नेमका काय प्रकार आहे हे त्यांच्या ध्यानी येईना.

हे वाचा-तुम्हालाही बोलताना त्रास होतोय का? दुर्लक्ष करू नका, असू शकतं Corona चं लक्षण

पारसमल जैन हे महाराष्ट्रातील भिवंडी इथे व्यापारी आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापार बंद आहे. त्यामुळे 20 दिवसांपूर्वी ते आपल्या गावी जालौर इथे आले. 5 वर्षांपूर्वी त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये सोनं ठेवलं होतं. सोनं काढण्यासाठी त्यांनी बँकेत जाऊन लॉकर उघ़डला आणि ते जागीच स्तब्ध झाले.

पारसमल यांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बँकेचं लॉकर उघडल्यानंतर त्यांना सोन्याऐवजी मार्बल दगडाचे तुकडे दिसल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पारसमल यांनी SBI शाखेच्या बँक मॅनेजरसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बँक मॅनेजरकडून त्याचं उत्तर आलं नाही. बँकेतील कर्मचारीही या प्रकरणी मूक गिळून गप्प होते. त्यामुळे पारसमल यांनी तात्काळ पोलिसांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

हे वाचा-जेव्हा भुकेलेल्या दीपिकाला आमिरनं दिलं नव्हतं जेवण, अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

बँकेतील लॉकर हे फक्त ग्राहकाच्या सहीनेच उघडले जातात त्याची एक चावी ग्राहकाकडे आणि दुसरी मास्टर की बँकेकडे असते. ग्राहकाच्या सही शिवाय लॉकर उघडण्याची परवानगी मिळत नाही. जेव्हा ग्राहक लॉकर उघडण्यासाठी गेला तेव्हा लॉकर व्यवस्थित होते. तिथे कोणत्याही प्रकारे तोडफोड झालेली नव्हती. अशी माहिती बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.

कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी बाग सिंह म्हणाले की, तक्रारीनुसार पारसमलने पाच वर्षांपूर्वी लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. तिथे आताा मार्बलचे दगड सापडले आहेत. हा प्रकार नक्कीच अजब आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.

हे वाचा-मोठी बातमी! महाराष्ट्रात 31 मेपर्यंत LOCKDOWN वाढवला, जाणून घ्या कसा चौथा टप्पा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 17, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या