Home /News /national /

PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला कोरोनाचा ब्रेक, बुलेट ट्रेनचा वेग मंदावला

PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला कोरोनाचा ब्रेक, बुलेट ट्रेनचा वेग मंदावला

बुलेट ट्रेन सुरू होण्याची 15 ऑगस्ट 2022 ही नियोजित तारीख ठरविण्यात आली होती. मात्र आता ही तारीख बदलावी लागणार आहे.

    नवी दिल्ली 10 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला (Bullet Train) कोरोनामुळे धक्का बसला आहे. मुंबईहून अहमदाबादला जाणारी ही गाडी 508 किलोमीटर धावणार आहे. मात्र कोरोनामुळे या प्रोजेक्टचा सगळं वेळापत्रकच कोलमडण्याची शक्यता आहे. या आधीच जमीन अधिग्रहण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. आता कोरोनामुळे सगळंच गणित बिघडलं असून हा प्रोजेक्ट केव्हा होईल हे आता रेल्वेलाही सांगता येण्याची परिस्थिती नाही. बुलेट ट्रेन सुरू होण्याची 15 ऑगस्ट 2022 ही नियोजित तारीख ठरविण्यात आली होती. मात्र आता ही तारीख बदलावी लागणार आहे. या योजनेवर 1 लाख 10 हाजार कोटी रुपये खर्च येणार आहे. मोदी सरकारच्या मोठ्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. वेगानं चालणाऱ्या या ट्रेनमध्ये फोल्डेबल बेड्स आणि वेगवेगळ्या खोल्याही आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एसी फर्स्ट क्लासपेक्षा 1.5 पटीनं जास्त भाडं द्यावं लागेल. देशाची पहिली बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबाद जाईल. या ट्रेनमध्ये काय काय सुविधा असतील ते पाहा. सोशल मिडीयावर न्यायाधीशांवर होणाऱ्या वैयक्तिक हल्ल्याबाबत कायदामंत्री नाराज पहिली बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबाद 508.17 कि.मी. प्रवास करेल. यात ती महाराष्ट्रात 155.76 किमी, गुजरातमध्ये 384.04 किमी आणि दादर नागर हवेलीत 4.3 किमी प्रवास करेल. लढाऊ विमान राफेल IAF मध्ये झालं सामील; वॉटर सॅल्यूट देत केला सन्मान, पाहा PHOTOS अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या मार्गावर अहमदाबाद, आनंद, साबरमती, भरुच, सूरत, बिलिमोरा, वडोदरा, बोईसर, विरार, वापी, ठाणे आणि मुंबई या 12 स्टेशन्सवर थांबेल. पहिली बुलेट ट्रेन रात्री 8.30 ते 9च्या मध्ये चालेल. ही ट्रेन समुद्राच्या खालूनही जाईल.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या