Home /News /national /

Corona Virus New Updates: Corona महामारी संपलेली नाही, नवीन व्हेरिएंट येण्याचा धोका; तज्ज्ञांनी केलं सावध

Corona Virus New Updates: Corona महामारी संपलेली नाही, नवीन व्हेरिएंट येण्याचा धोका; तज्ज्ञांनी केलं सावध

corona

corona

Corona Virus Updates: देशात कोरोनाच्या (Coronavirus)रुग्णांमध्ये घट सुरूच आहे. रिकव्हरी रेट (Positivity rate) वाढत आहे आणि सकारात्मकता दर कमी होत आहे.

    नवी दिल्ली, 04 मार्च: देशात कोरोनाच्या (Coronavirus)रुग्णांमध्ये घट सुरूच आहे. रिकव्हरी रेट (Positivity rate) वाढत आहे आणि सकारात्मकता दर कमी होत आहे. कोरोनाची परिस्थिती बदलत असताना लोकांना कोरोना महामारी कायमची संपली असं वाटतंय. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोना आता कायमचा संपला आहे, असं समज करुन घेऊ नका. कारण हा व्हायरस अजूनही आपल्यामध्ये आहे. या व्हायरसचा नवीन व्हेरिएंट जगात कधीही येऊ शकतो. अशा स्थितीत सध्या कोरोनाबाबत गाफील राहणं योग्य नाही. कोविड तज्ज्ञ डॉ जुगल किशोर म्हणाले की, कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. उत्परिवर्तनामुळे, हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो. जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात. दरम्यान नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण लोकसंख्येचा मोठा भाग ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित झाला आहे. लोकांमध्ये संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असते. अशा परिस्थितीत जोपर्यंत धोकादायक व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत पुढची लाट येणार नाही. पण यामुळे लोकांना असं वाटू नये की कोरोना आता कायमचा संपला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव कुमार अग्रवाल म्हणतात की, जगात एका आठवड्यासाठी सरासरी 15 लाखांहून अधिक प्रकरणे दररोज येत आहेत. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. भारतातील परिस्थिती सुधारतेय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 55.7 टक्क्यांनी घट झाली आहे. मृत्यूदरही 76.6 टक्क्यांनी खाली आला आहे. भारतात लसीकरणाचा खूप फायदा झाला आहे. दुसऱ्या लाटेत, जिथे एका दिवसात चार लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, तिसर्‍या लाटेचा उच्चांक चार लाखांच्या खाली राहिला. तिसऱ्या लाटेत, मृत्यूची प्रकरणे आणि दैनंदिन प्रकरणे देखील दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचे शिखर लवकर आले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या