मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनामुळे ‘कॅफे कॉफी डे’चा रस्ता सुना सुना; 280 आऊटलेट्सना टाळ

कोरोनामुळे ‘कॅफे कॉफी डे’चा रस्ता सुना सुना; 280 आऊटलेट्सना टाळ

कोरोनामुळे अनेक मोठ मोठ्या रेस्तरॉ साखळीला फटका सहन करावा लागत आहे

कोरोनामुळे अनेक मोठ मोठ्या रेस्तरॉ साखळीला फटका सहन करावा लागत आहे

कोरोनामुळे अनेक मोठ मोठ्या रेस्तरॉ साखळीला फटका सहन करावा लागत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 20 जुलै : आता पहिल्यासारखं नाक्यावर गप्पांचा फड रंगत नाही...कॉलेज सुटल्यानंतर मित्राचा ग्रुप मॅकडीमध्ये बर्गरवर मनसोक्त ताव मारत नाही...गप्पांसाठी दोन मैत्रिणी कॅफे कॉफी डेमध्ये तासंनतास बसत नाहीत...कोरोनामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. तो आवश्यकही आहे..

सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डे येथे मित्र-मैत्रिणींचा गप्पांचा फड रंगायचा..कोणी गरम तर कोणी कोल्ड कॉफीचे घोट घेत घेत आपल्या कडू-गोड आठवणींना उजाळा द्यायचे. मात्र कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांनाच मोठा फटका सहन करावा लागत आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक कॅफेंना टाळ लागलं आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ लागत नसल्याने सुरू असलेल्या वित्तीय वर्षातील पहिल्या तीन महिन्यात 280 रेस्तरॉ बंद केले आहेत. यामुळे त्यांच्या रेस्तरॉंमध्ये घट होऊन 30 जून 2020 रोजी 1480 शिल्लक राहिली आहेत. कॅफे कॉफी डे ब्रँडचे स्वामित्व कॉफी डे ग्लोबल यांच्याजवळ आहे. जी कॉफी डे एंटरप्रायजेस लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे.

हे वाचा‘मेड इन इंडिया’चा डंका; चीनवरील बंदीनंतर लघु उद्योजकांना सुगीचे दिवस

सोमवारी कंपनीने सांगितले की – कमी मार्जिन मिळत असल्याने निर्यात सध्या ठप्प आहे. त्यामुळे सध्या कॅफे सुरू ठेवण्यासाठी लागणारी रक्कम, भविष्यातील खर्च आदी पाहता कंपनीने तब्बल 280 रेस्तरॉ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे प्रवर्तक वी.जी.सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर कंपनी आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. या वर्षी मार्चमध्ये कंपनीने 13 कर्जदारांना 1644 कोटी रुपये परतवण्याची घोषणा केली होती.

First published:

Tags: Corona virus in india