लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 1200 लोकांना घेऊन धावली पहिली ट्रेन

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 1200 लोकांना घेऊन धावली पहिली ट्रेन

पहाटे 5 च्या सुमारात तेलंगणाच्या लिंगमपल्ली येथून रांचीला एक ट्रेन रवाना झाली. 24 डब्ब्याच्या ट्रेनमधून जवळजवळ 1200 लोकांना आपल्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

  • Share this:

तेलंगणा, 01 एप्रिल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळं अनेक लोक घरापासूर दूर अडकले आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी हे अडकले आहेत. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी पहाटे 5 च्या सुमारात तेलंगणाच्या लिंगमपल्ली येथून रांचीला एक ट्रेन रवाना झाली. 24 डब्ब्याच्या ट्रेनमधून जवळजवळ 1200 लोकांना आपल्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या गाइडलाइन्सनुसार ही ट्रेन सोडण्यात आली होती. झारंखडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अडकलेल्या कामगारांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही ट्रेन सोडण्यात आली. ही ट्रेन आज रात्री 11 पर्यंत झारखंडमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान ट्रेनमधील प्रवाश्यांना क्वारंटाइन पाळण्याची सक्ती करण्यात आली होती. सर्व नियमांचे पालन तसेच गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनानंतरच ही ट्रेन सोडण्यात आली.

ही ट्रेन सुरू करण्यात आली असली तरी इतर राज्यांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. पायलट प्रोजेक्ट तत्वावर ही पहिली ट्रेन सोडण्यात आली. दरम्यान इतर ट्रेनबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही आहे.

First published: May 1, 2020, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading