मुंबई 25 मे: चीन, इटली, स्पेन, अमेरिका, इराण नंतर आता भारत कोरोना व्हायरसचा नवा हॉट स्पॉट होत असल्याचा दावा जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर द वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आलेल्या एका रिपोर्टने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. भारतातला कोरोना व्हायरस अधिक शक्तिशाली झाला असून तो युवकांना मोठ्या संख्येने टार्गेट करत असल्याचं त्यात म्हटलं आहे. भारतात आत्तापर्यंत 1.38 लाख लोक बाधित झाले असून 4021 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला त्या देशातल्या आकडेवारीवरून तिथे ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात बळी गेला आहे. मात्र विकसित आणि तरुण देश समजल्या जाणाऱ्या भारत आणि ब्राझिलमध्ये हा व्हायरस तरुणांचा जास्त बळी घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.
या अहवालानुसार ब्राझिलमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 50 पेक्षा कमी वयाचे 5 टक्के लोकं आहेत. स्पेन आणि इटलीच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्के जास्त आहे. तर भारतात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 60 टक्के लोक हे 50 पेक्षा कमी वयाचे आहेत असंही त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
हे वाचा - पंतप्रधानांची Live मुलाखात सुरू असतानाच भूकंपाचा धक्का, नंतर काय झालं पाहा VIDEO
मिशिगन युनिव्हर्सिटी (University of Michigan) आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं (Johns Hopkins University) कोरोना मॉडेलद्वारे चेतावणी दिली आहे की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात 21 लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकारच्या अडचणी वाढू शकतात. तर, लॉकडाऊनचे नियम आणखी कडक होऊ शकतात.
मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ बायोस्टॅटिस्टिक्सचे आणि रोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी एजन्सी रॉयटर्सला याबाबत सांगितले. भारतातील परिस्थिती येत्या काळात आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती तयार केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, भारतात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही, सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची प्रकरणं 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत.
मजूर परत हवे असतील, परवानगी घ्या - योगी सरकारच्या नियमावरून महाराष्ट्रात वाद
जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि मुखर्जी यांच्या टीमनं भारतातील आरोग्य सेवा आणि रुग्णालयात कमी बेड व व्हेंटिलेटरबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्या भारतात रूग्णालयात सुमारे 7 लाख 14 हजार बेड आहेत, तर 2009 मध्ये ही संख्या सुमारे 5 लाख 40 हजार होती. संसर्गाच्या संख्येत पहिल्या 10 देशांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. तर त्यानंतर ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की यांचा क्रमांक लागतो.