मराठी बातम्या /बातम्या /देश /Corona Vaccine Update: सीरमनंतर Made in India लस आहे रांगेत; पण आणखी माहिती घेतल्यानंतरच निर्णय

Corona Vaccine Update: सीरमनंतर Made in India लस आहे रांगेत; पण आणखी माहिती घेतल्यानंतरच निर्णय

तज्ज्ञ समितीची (SEC) बैठक शुक्रवारी रात्री उशीरा संपली. पण Bharat Biotech च्या लशीसंदर्भात आणखी काही माहिती देण्याची सूचना SEC ने केली आहे.

तज्ज्ञ समितीची (SEC) बैठक शुक्रवारी रात्री उशीरा संपली. पण Bharat Biotech च्या लशीसंदर्भात आणखी काही माहिती देण्याची सूचना SEC ने केली आहे.

तज्ज्ञ समितीची (SEC) बैठक शुक्रवारी रात्री उशीरा संपली. पण Bharat Biotech च्या लशीसंदर्भात आणखी काही माहिती देण्याची सूचना SEC ने केली आहे.

    नवी दिल्ली, 1 जानेवारी:  भारतात कोरोना लशीसंदर्भात (Corona Vaccine) नेमलेल्या तज्ज्ञ समितीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच चांगली बातमी दिली. Oxford-AstraZeneca Vaccine ची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ Made In India लस असलेल्या भारत बायोटेकच्या लशीला मान्यता मिळण्याची प्रतीक्षा होती, पण या निर्णयासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तज्ज्ञ समितीची (SEC) बैठक शुक्रवारी रात्री उशीरा संपली. पण Bharat Biotech च्या लशीसंदर्भात आणखी काही माहिती देण्याची सूचना SEC ने केली आहे. त्यानंतरच या लशीच्या वापराबाबतचा निर्णय होऊ शकतो.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या कोव्हिशील्ड( Oxford-AstraZeneca Covishield ) लशीला पहिल्यांदा परवानगी मिळू शकते. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा (Bharat Biotech Covaxine) नंबर लागू शकतो, असं सांगितलं जात होतं.  'नव्या वर्षाच्या स्वागतालाच आपल्याकडे चांगली बातमी येऊ शकते', असं सूतोवाच औषध महानियंत्रकांनी( DCGI) कालच केलं होतं. त्यानंतर आज तज्ज्ञ समितीची बैठक झाली. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने शोधलेल्या आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत असलेल्या कोव्हिशील्ड या लशीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर तज्ज्ञ समितीसमोर भारत बायोटेकचं प्रेझेंटेशन सुरू झालं. पण त्यांच्याकडे आणखी काही डेटा या समितीने मागितला आहे. त्यामुळे या भारतीय बनावटीच्या लशीला हिरवा कंदिल मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

    Oxford-AstraZeneca Vaccine ची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. लशीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड (Oxford-AstraZeneca Covishield Vaccine) लशीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं सांगितलं आहे. आता औषध नियंत्रक महासंचालकांनी लशीसाठी परवानगी दिली की, सर्वसामान्यांसाठी ही लस लवकरच उपलब्ध होऊ शकेल. औषध महानियंत्रकही Corona Vaccine ला परवानगी देतील. एकदा Central Drugs Standard Control Organization (CDSCO) ने परवानगी दिली की भारतात कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल. या कोरोना लशीच्या व्यावसायिक उपयोगाला पूर्वपरवानगी असेल तरच (conditional marketing authorisation) मान्यता देण्यात आली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus