मराठी बातम्या /बातम्या /देश /

पुलवामा हल्ल्यानंतर लोकांमध्ये उद्रेक, जम्मूतील काही भागांमध्ये कर्फ्यू

पुलवामा हल्ल्यानंतर लोकांमध्ये उद्रेक, जम्मूतील काही भागांमध्ये कर्फ्यू

पुलवामा हल्ल्यानंतर आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले असून जम्मूतील काही भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीर, 15 फेब्रुवारी : गुरूवारी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 37 जवान शहिद झाले. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून लोक रस्त्यावर उतरले आहे. देशातील अनेक भागत पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात येत असून दहशतवाद्यांचा खात्मा करा अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, जम्मूमध्ये देखील लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी त्यांनी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पण, जम्मूतील काही भागामध्ये आता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला हा मागील 30 वर्षातील सर्वात मोठा हल्ला आहे.

37 जवान शहिद

स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर आदळून दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात 37 जवान शहिद झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानविरोधी जोरजार घोषणाबाजी करत, सूड घ्या अशी मागणी आता देशातून करण्यात येत आहे.

दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली – मोदी

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली अशी प्रतिक्रिया देत दहशतवाद्यांना सरळ इशारा दिला आहे. शिवाय, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच लष्कराला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष सरकारसोबत असल्याचं सांगितलं.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ला

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.

VIDEO - मुस्लिम बांधवांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

First published:

Tags: Corfu in jammu, Jammu kashmir, Pulwama attack, Pulwama terror attack, Terror attack