Home /News /national /

केवळ लग्न करण्यासाठी धर्मांतर वैध नाही, हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

केवळ लग्न करण्यासाठी धर्मांतर वैध नाही, हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

'इस्लाम विषयी माहिती न घेता, त्या धर्मातल्या तत्व आणि शिकवणुकीचा अभ्यास न करता धर्मांतर करणं हे इस्लामला मान्य नाही.'

    अलाहाबाद 30 ऑक्टोबर: लग्नासाठी धर्मांतर करणं योग्य की अयोग्य यावर देशात कायम चर्चा सुरू असते. त्यावर वाद विवादही होत असतात. अशाच एका प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने ((Allahabad High Court)) महत्त्वाचा निकाल दिला आहे. केवळ लग्न (Marriage) करण्यासाठी धर्मांतर करणं हे वैध नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं. उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका जोडप्याने आंतरधर्मिय विवाह केला होता. या विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे कुटुंबियांना आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यापासून रोखा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी कोर्टात दाखल केली. पण या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत कोर्टाने याचिका फेटाळली होती. न्यायमूर्ती एम.सी, त्रिपाठी यांनी हा आदेश दिला आहे. एका मुस्लिम मुलीने 29 जून 2020रोजी हिंदू धर्म स्वीकारला होता. महिनाभरानंतर 31 जुलैला तिने हिंदु मुलासोबत लग्न केलं होतं. यावरून फक्त लग्न करण्यासाठीच धर्मांतर केल्याचं स्पष्ट होते असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. OBCसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता सैनिकी शाळांमध्येही मिळणार आरक्षण यासाठी कोर्टाने नूर जहां बेगम प्रकरणाचा हवाला दिला. यात कोर्टाने फक्त लग्न करण्यासाठी धर्मांतर करणं मान्य नसल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणात हिंदू मुलीने धर्म परिवर्तन करून मुस्लिम मुलाशी लग्न केलं होतं. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने असं धर्मपरिवर्तन वैध नसल्याचं म्हटलं होतं. कोर्टाने कुराणातल्या हादीसचं उल्लेख करत असं मत नोंदवलं होतं की, इस्लाम विषयी माहिती न घेता, त्या धर्मातल्या तत्व आणि शिकवणुकीचा अभ्यास न करता धर्मांतर करणं हे इस्लामला मान्य नाही. कोर्टाचा हा निर्णय दूरगामी परिवर्तन करणारा ठरू शकतो.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Marriage

    पुढील बातम्या