Home /News /national /

'मुस्लीम मुलींच्या धर्मांतराची 'जमियत'ला चिंता', काढला 'हा' अजब फतवा

'मुस्लीम मुलींच्या धर्मांतराची 'जमियत'ला चिंता', काढला 'हा' अजब फतवा

मुस्लीम मुलींनी मुलांबरोबर शिकू नये असा अजब फतवा भारतातल्या एका मौलवींनी काढला आहे.

    दिल्ली, 1 सप्टेंबर : मुस्लीम धर्मातील तरुण मुलींचे धर्मांतरण करण्याच्या प्रमाणावर आता जमीयत उलेमा ए हिंद या मुस्लिम संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी मुलींसाठी वेगळ्या शाळा सुरू करण्याचीही गरज असल्याचे या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मुस्लिम मुलींचे धर्मांतरण का होत आहेत? किंवा यामागे काय कारणे आहेत याबाबत जमीयत उलेमा ए हिंदने अजून खुलासा केलेला नाही. परंतु एक पत्रक जारी करून याबाबत मुस्लिम मुलींनी मुलांबरोबर शिकू नये असा अजब फतवा काढला आहे. काही गैरमुस्लीम युवक संघटित पातळीवर मुस्लिम मुलींना फुस लाऊन लग्न करत आहेत. त्यांना यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मुस्लिम मुलींना धर्मांचे योग्य ज्ञान नसल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा असाव्यात आणि त्यात मुलांचा समावेश नसावा अशी भूमिका जमीयतने जारी केलेल्या पत्रकाच्या माध्यमातून घेतली आहे. गोंधळाचा नवा अंक : काबुल एअरपोर्ट बंद, पाकिस्तान-इराण सीमेवर नागरिकांची झुंबड जमीयत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी हे मुस्लिम मुलींच्या धर्मांतरणावर बोलताना म्हणाले की मुलींसाठी मुस्लिमांबरोबरच गैरमुस्लिमांनीही वेगळ्या शाळा सुरू करायला हव्या. त्यामुळे हे प्रकार रोखले जातील. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादंग सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जमीयतच्या भूमिकेवर टीका करताना म्हटलंय की 'हीच लोक मुस्लिम तुष्टीकरणास जबाबदार आहेत,यूपीत मुलगा आणि मुलगी समान आहे, अशा लोकांना जनता माफ करणार नाही. अफगाणिस्तानातील महिला शिक्षण घेऊ शकणार का? तालिबानचा अजब फतवा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यावर भूमिका मांडली आहे. सपाचे नेते सुनिल साजन म्हणाले की 'देश आता या गोष्टींपासून फार पुढे गेला आहे. हा विकृत विचार जमीयत आणि मदनी यांचा असू शकतो. वेगवेगळ्या शाळांत मुलींना पाठवण्याची गरज नाही तर चांगले संस्कार करण्याची गरज आहे असं उत्तर त्यांनी जमियतचे अध्यक्ष अरशद मदनी यांना दिले आहे. धार्मिक संस्थांचं काम धार्मिक गोष्टींकडे लक्ष देण्याचे आणि शिक्षा व्यवस्थेतून विद्यार्थ्यांची निती ठरत असते त्यामुळे या दोन्ही गोष्टींना एकत्र करण्याची गरज नाही. असं वक्तव्य बहुजन समाज पक्षाचे नेते सुधींद्र भदौरीया यांनी केले आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मोहसीन रजा यांनी या सर्व प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. जमीयतच्या नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की टोपी घालण्याने कुणी मौलाना होत नाही. त्यासाठी त्याला ज्ञानाची गरज असते. अरशद मदनींचे संघटन हे देशविरोधी आणि तालिबानी विचारांचे आहे. देश वैचारिक दृष्टीने मदनींपेक्षा फार पुढे गेला आहे त्यामुळे अशी वक्तव्ये सहन केली जाणार नाही. अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल असं मंत्री मोहसिन रजा यांनी स्पष्ट केले आहे.
    First published:

    Tags: Education, Muslim, Women

    पुढील बातम्या