काँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल

काँग्रेस सर्व आमदार सध्या इगल्टन रिसॉर्टमध्ये आहेत. अशातच रिसॉर्टमध्येच अनंत सिंग आणि गणेश या दोघांमध्ये शनिवारी रात्री वाद झाला.

News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2019 02:34 PM IST

काँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल

बंगळुरू, 20 जानेवारी : कर्नाटकमधील काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी झाली आहे. इगल्टन रिसॉर्टमध्ये शनिवारी रात्री अनंत सिंग आणि गणेश हे काँग्रेसचे दोन आमदार एकमेकांना भिडले आहेत. या हाणामारीत जखमी झालेल्या एका आमदाराला उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे.

काँग्रेस सर्व आमदार सध्या इगल्टन रिसॉर्टमध्ये आहेत. अशातच रिसॉर्टमध्येच अनंत सिंग आणि गणेश या दोघांमध्ये शनिवारी रात्री वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर थेट हाणामारीत झालं. हाणामारी करणारे दोन्ही आमदार बेल्लारी जिल्ह्यातील असल्याची माहित आहे

कर्नाटकमधील राजकीय नाट्य अजूनही सुरूच आहे. भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याच्या चर्चेने काँग्रेस-जेडीएसच्या गोटात खळबळ उडाली आहे. अशातच आता काँग्रेसचे आमदार एकमेकांना भिडले आहेत.

दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यासाठी काँग्रेसने 'व्हिप'ही बजावला होता. मात्र पक्षाचा आदेश धुडकावत चार आमदार गैरहजर राहिल्याने खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळूरूजवळच्या एका रिसॉर्टमध्ये हलवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजप 'ऑपरेशन लोटस' राबवत असल्याचं स्पष्ट झालं होतं. काँग्रेसचे आमदार गळाला लावण्याचे भाजपचे प्रयत्न होते. महाराष्ट्रातूनही सूत्र हालवली जात होती. काही आमदार मुंबईतही आले होते. मात्र पुरेसं संख्याबळ न जमल्याने भाजपचा प्रयोग यशस्वी झाला नाही.

Loading...

काँग्रेस आणि जेडीएस यांच्यामध्येही आलबेल नसल्याने भाजप त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. तर जेडीएस आणि काँग्रेसने भाजपवर घोडेबाजार करण्याचा आरोप केलाय. तर आधी आपलं घर सांभाळा भाजपवर आरोप करू नका असा पलटवार भाजपने केला.


Special Report : लग्नाची डेडलाईन ठरली डेथलाईन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...