बेगुसराय (बिहार), 7 मार्च : आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिहारमधील (Bihar) बेगुसराय (Begusarai) या त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एका कृषी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना सिंह यांची गाडी अधिकाऱ्यांवर घसरली. ‘अधिकारी लोकांच्या तक्रारी ऐकत नसतील तर त्यांना छडीनं मारा’, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
काय म्हणाले सिंह?
केंद्रीय मत्सपालन, पशूपालन आणि डेयरी विभागाचे मंत्री असलेले गिरीराज सिंह यावेळी म्हणाले की, ‘‘अधिकारी लोकांच्या तक्रारी ऐकत नाहीत, असं मला नेहमी सांगण्यात येते. मला त्यांना सांगयाचे आहे की, इतक्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडं का येता? खासदार, आमदार, गावाचे सरपंच, जिल्हाधिकारी, बीडीओ या सर्वांचं लोकांची सेवा करणे हेच कर्तव्य आहे. जर ते तुम्ही सांगितलेलं ऐकत नसतील तर दोन्ही हातांमध्ये काठी घ्या आणि त्यांच्या डोक्यात मारा. त्यानंतरही तुमचे काम होत नसेल तर गिरीराज सिंह तुमच्या सोबत आहे.’
राजकीय वातावरण तापले
गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यानंतर बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलानं (RJD) नितीश कुमार सरकारवर (Nitish Kumar Government) टीका केली आहे. राज्यात सरकार आहे की महाजंगलराज? असा प्रश्न पक्षानं विचारला आहे.
( वाचा : मोदींच्या उपस्थितीत आज भाजपचे कोलकातामध्ये शक्तिप्रदर्शन, मिथुनही देणार साथ )
एक तरफ @NitishKumar जी युवाओं से कहते हैं कि सरकार या अधिकारी का विरोध करोगे, धरने पर बैठोगे या सोशल मीडिया पर लिखोगे तो जेल भेज देंगे, नौकरी नहीं लेने देंगे!
दूसरी तरफ सनकी गिरिराज सिंह कहते हैं अधिकारियों को बाँस उठाकर मारो!
यह सरकार चल रही है या #महाजंगलराज चल रहा है?
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) March 6, 2021
आरजेडीनं या विषयावर एक ट्विट देखील केले आहे. ‘एका बाजूला नितीश कुमार तरुणांना सांगतात की, सरकारी अधिकाऱ्यांना विरोध कराल, धरणे आंदोलन कराल किंवा सोशल मीडियावर काही मत व्यक्त केले तर तुरुंगात जाल. दुसरीकडं सनकी गिरीराज सिंह म्हणतात अधिकाऱ्यांना काठीनं मारा. हे सरकार आहे की #महाजंगलराज?’ या शब्दांमध्ये आरजेडीनं सरकारवर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, India, Modi government, Nitish kumar, PM narendra modi