आशियाला 'रेपीस्तान' म्हणणाऱ्या IAS अधिकाऱ्याचा राजीनामा, लोकसभा लढवणार?

आशियाला 'रेपीस्तान' म्हणणाऱ्या IAS अधिकाऱ्याचा राजीनामा, लोकसभा लढवणार?

शाह फैसल हे फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षात सामील होणार आहे

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 09 जानेवारी : मागील वर्षी बलात्कार प्रकरणावर टि्वट केल्यामुळे वादात अडकलेले जम्मू-काश्मीरचे आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शाह फैसल हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

35 वर्षीय आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी सोमवारी स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी अर्ज केला आहे. अशी ही माहिती मिळतेय की, शाह हे फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षात सामील होणार आहे. घाटीतील बारामुल्ला मतदरासंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

शाह फैसल यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. परंतु, या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यानंतर कामगार विभागाकडून त्यांच्या अर्जाला परवानगी दिली जाईल, असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

राजीनामा मंजूर झाल्यानंतर फैसल हे फारूख आणि उमर अब्दुल्ला यांची भेट घेणार आहे. पक्षात प्रवेश घेण्याआधी त्यांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

शाह फैसल यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात बलात्कार प्रकरणावर 'दक्षिण आशिया ही रेपिस्तान आहे', असं टि्वट केलं होतं.

त्यांच्या टि्वटनंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, फैसल आपल्या टि्वटवर ठाम होते आणि अधिकाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही का? असा मुद्दा उपस्थितीत केला होता.

===========================

First published: January 9, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading