भरधाव कारवर कोसळला कंटेनर, पाहा भीषण अपघाताचा थरारक VIDEO

भरधाव कारवर कोसळला कंटेनर, पाहा भीषण अपघाताचा थरारक VIDEO

चालकानं कंटेनरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आणि ...

  • Share this:

मोरबी, 09 ऑगस्ट : अनलॉक 3 मध्ये हळूहळू सगळ्या सेवा-सुविधा सुरु केल्या जात असतानाच रस्त्यावर एक भयंकर अपघात घडला आहे. भलामोठा सामान घेऊन जाणारा कंटेनर कारवर कोसळल्यानं मोठा अपघात झाला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव कारवर कंटेनर कोसळल्यानं कारचा चुराडा झाला आहे. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील मोरबी इथे माडिया-मियाणा महामार्गावर भरधाव कारवर कंटेनर कोसळला. चालकानं कंटेनरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आणि कंटनेर थेट कारवर उलटला.

या दुर्घटनेत कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारवर कंटेनर उलटल्यानं मृतदेह कार कापून काढावे लागले. तीन लोकांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून केला हल्ला, प्रकृती नाजूक

महाराष्ट्रात टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

महाराष्ट्रात बीडमध्ये वाळू भरलेल्या टिप्परच्या धडकेत तीनजण ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा इथली ही घटना आहे. रात्री 10च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 9, 2020, 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading