आता ग्राहकांना फसवलत तर जन्मभराची अद्दल घडेल, सरकारने केला नवा कायदा!

आता ग्राहकांना फसवलत तर जन्मभराची अद्दल घडेल, सरकारने केला नवा कायदा!

ग्राहकांना फसवलं तर काही लाखांच्या दंडापासून ते जन्मठेपेच्या दंडाची तरतूद या कायद्यात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 21 डिसेंबर : ग्राहकांना फसविणाऱ्या जाहीराती, भेसळ यांच्या विरुद्ध केंद्र सरकारने एक कडक कायदा केला आहे. गुरुवारी लोकसभेत या कायद्याला मंजूरी मिळाली. ग्राहक संरक्षण कायदा 2018 (Consumer Protection Bill 2018) असं या कायद्याचं नाव आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खास आयोगाचीही निर्मिती करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यात तब्बल 32 वर्षांनी बदल करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. ज्या कंपनीने खोटी जाहीरात केल्याचं सिद्ध झालं त्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड होऊ शकतो.

त्या कंपनीकडून दुसऱ्यांदा गुन्हा घडला तर दंडाची रक्कम 50 लाख रुपये आणि पाच वर्षांचा तुरूंगवास. तर भेसळ केल्याचं सिद्ध झाल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र राज्य आणि जिल्हास्तरावर आयोग स्थापन करण्यात येणार आहेत. हा आयोग कंपनीला बाजारातून आपलं उत्पादन काढून घेण्याचा आदेश देऊ शकतं.

केंद्रीय आयोगाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर सहा महिन्याचा तुरुंगवास आणि 20 लाखांचा दंड अशी शिक्षा होऊ शकते. ग्राहकांना काही दुखापत झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्या प्रमाणात शिक्षा होऊ शकते.

First published: December 21, 2018, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading