20 रुपयांची बाटली 40 ला विकणाऱ्या मल्टिप्लेक्सला दणका, एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर नुकसान भरपाई देणार

20 रुपयांची बाटली 40 ला विकणाऱ्या मल्टिप्लेक्सला दणका, एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर नुकसान भरपाई देणार

मॉलमध्ये ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरवल्या जातात. मात्र मल्टिप्लेक्सच्या वकिलांना अर्धा लिटर पाण्याची बाटली 40 रुपयांत दिल्याचं अमान्य करता आलं नाही.

  • Share this:

बेंगळुरू, 12 फेब्रुवारी : मोठे मॉल किंवा शॉपमध्ये अनेकदा एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत वस्तू विकल्या जातात. त्याविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करता येते. कर्नाटकातील बेंगळुरुत 20 रुपयांची पाण्याची बाटली 40 रुपयांत विकणं मल्टिप्लेक्सला महागात पडलं आहे. ओम नावाच्या व्यक्तीने मल्टिप्लेक्सविरुद्ध ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मल्टिप्लेक्सला अधिक घेतलेले पैसे परत देण्यासह 7 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अर्ध्या लिटर पाण्यासाठी बेंगलुरुतील रॉयल मिनाक्षी मॉलमध्ये ओमकडून 40 रुपये मागितले. त्याने 20 रुपये जास्त घेण्याबद्दल आक्षेप घेतला आणि मॅनेजरला नोटीस पाठवून जादा घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली. मॅनेजरकडून नोटिसीला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाही. त्यानंतर ओमने ग्राहक मंचाकडे तक्रा केली. त्यानंतर ग्राहकं मंचाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतलं. त्यावेळी मल्टिप्लेक्सच्या वतीने वकिलांनी पाण्याची बाटली 40 रुपयांत दिल्याचं मान्य केलं.

ग्राहक मंचाने या प्रकरणात मल्टिप्लेक्सला दोषी ठरवलं. त्यानंतर मल्टिप्लेक्सला आदेश दिले की, त्यांनी ओमला 12 टक्के दराने पैसे परत द्यावेत. तसेच याचिकाकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासासाठी 5 हजार रुपये आणि कायदेशीर बाबींसाठी खर्च झालेले 2 हजार रुपये 30 दिवसांच्या आत देण्यास सांगण्यात आलं आहे.

ग्लुकोमीटर, इन्सुलिन इंजेक्शन-पेनची नाही गरज; Diabetes साठी स्मार्ट पॅच पुरेसंं

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी मल्टिप्लेक्सच्या अधिकाऱ्यांनी सरकारकडून परवानगी मिळाल्याचाही दावा केला. त्यानी म्हटलं की, मॉलमध्ये ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरवल्या जातात. मात्र मल्टिप्लेक्सच्या वकिलांना अर्धा लिटर पाण्याची बाटली 40 रुपयांत दिल्याचं अमान्य करता आलं नाही.

'सांगायला ऑकवर्ड वाटतंय पण...', विकिपीडियाने सर्व भारतीय युजर्सना पाठवला मेसेज

First published: February 12, 2020, 8:01 PM IST
Tags: multiplex

ताज्या बातम्या