म्हैसूर, 01 जून: पोटच्या मुलांसाठी आईवडील कोणत्याही गोष्टी करण्यासाठी तयार असतात. रक्ताचं हे नातं सर्वश्रेष्ठ मानलं जातं ते याकरताच. त्यात प्रश्न जर मुलाच्या जीवाचा असेल तर स्वत:च्या जीवाची बाजी लावताना देखील ते मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना कर्नाटकमधील (Karnataka News) म्हैसूर याठिकाणी घडली आहे. मानसिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्य मुलासाठी त्याच्या वडिलांनी 300 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे.
45 वर्षीय आनंद यांची ही कहाणी. ते एक बांधकाम मजूर आहेत. म्हैसूरमधील कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून बंगळुरु गाठलं. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन केला आणि मुलासाठी औषध आणलं. आनंद सांगतात की, 'माझा मुलगा मानसिकरीत्या कमजोर आहे. आहे. मला (औषधासाठी) सायकलने जावे लागले. जेव्हा मी विचारले तेव्हा माझ्याबरोबर कार, दुचाकी, किंवा ऑटोने कुणीही येण्यास तयार नाही. मी म्हैसूरमध्ये बर्याच ठिकाणी औषध शोधले. पण ते फक्त NIMHANS मध्येच उपलब्ध होते. डॉक्टरांनी मला सांगितले की जर हा एक डोस चुकला तर त्याला पुन्हा 18 वर्षे हा डोस द्यावा लागेल.'
Karnataka: A 45-year-old Anand, a resident of Koppalu village in Mysore cycles 300 km to Bengaluru to bring his son's medicine
"I asked for my son's medicines here but couldn't find it. He can't skip medicines even for a day. I went to Bengaluru & it took me 3 days," says Anand pic.twitter.com/nnAUBIBqna — ANI (@ANI) June 1, 2021
लॉकडाऊनमुळे त्यांची कोणत्याही टॅक्सी किंवा ऑटोवाल्याने मदत केली नाही. मोटारसायकलवरूनही बंगळुरुमध्ये जाण्यास कुणी तयार झालं नाही. त्यामुळे त्यांना NIMHANS मध्ये सायकलनेच पोहोचावं लागलं.
डॉक्टरांच्या मते त्यांचा मुलगा एकही डोस मिस करू शकत नाही. पण ते औषध म्हैसूरमध्ये उपलब्धच नसल्याने सायकलने त्यांना बंगळुरू गाठावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.