श्रीलंका बॉम्ब स्फोटाचं मुंबई कनेक्शन

श्रीलंका बॉम्ब स्फोटाचं मुंबई कनेक्शन

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटामुळं 1993मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोच्या आठवमी ताज्या झाल्या.

  • Share this:

कोलंबो, 22 एप्रिल : रविवार सकाळी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर डे निमित्त उत्साहाचं वातावरण होतं. पण, ख्रिश्चनधर्मियांच्या ईस्टर डेला चर्च आणि हॉटेलमध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये जवळपास 290 जण मृत्युमुखी पडले. तर, 450 जखमी आहेत. या साखळी बॉम्बस्फोटानंतर 1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या. कारण, 12 डिसेंबर 1993 या दिवशी मुंबईकर आपापल्या कामात व्यस्त होता. पण, 13 ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांनी जवळपास 300 जणांचा मृत्यू झाला होता.

कुठे - कुठे झाले साखळी बॉम्बस्फोट

दुपारी 1.30 वाजताची वेळ. यावेळी सर्वकाही सुरळीत सुरू असताना बॉम्बे स्टॉक एक्सजेंचजवळ पहिल्या स्फोट झाला. यामध्ये 50 जणांना आपला जीव गमवावा लागला. स्फोटाची क्षमता ऐवढी होती की, इमारतींचं देखील नुकसान झालं. सर्वजण मदत कार्यात गुंतलेले असताना माहिममधील मच्छिमार वस्तीमध्ये दुसरा धमाका झाला. स्फोटांची मालिका ही अशीच सुरू होती. कारण, मुंबईमध्ये 13 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले. यावेळी दहशतवाद्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये आरडीएक्सचा वापर केला होता.

12 डिसेंबर 1993 या दिवशी मुंबईतील बीएसई, माहिम मच्छिमार कॉलनी, झवेरी बाझार, प्लाजा सिनेमा, सेंच्युरी बाजार, कथा बाजार, हॉटेल सी रॉक, एअर इंडिया इमारत, हॉटेल जुहू सेंटॉर, वरळी आणि पासपोर्ट ऑफिसजवळ देखील हे बॉम्बस्फोट झाले होते. दाऊद इब्राहिम हा या साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड होता. तो सध्या पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे.

कोलंबोतील बॉम्बस्फोटात JDSच्या 7 कार्यकर्त्यांचा मृत्यू

काय होता उद्देश, कोण-कोण होतं सहभागी

टायगर मेमननं दाऊद इब्राहिमला या कामी मदत केली होती. टायगर सध्या पाकिस्तानमध्ये आहे, असं बोललं जात आहे. दरम्यान, याप्रकरणी दोषी ठरवत याकूब मेमनला 30 जुलै 2015 या दिवशी फाशी देण्यात आली होती. दरम्यान मुंबई बॉम्बस्फोटातील 20 आरोपी अद्याप देखील फरार आहेत. यामध्ये जवळपास 189 जणांविरोधात केस दाखल करण्यात आली होती. 1992मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर याबद्दलची तयारी सुरू झाली होती. त्याला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचा ISIची मदत होती.

श्रीलंकेत आणिबाणी : भारताच्या सागरी सीमाही का केल्या सील?

श्रीलंकेत आणीबाणी

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सागरी सीमांवर हाय अलर्ट घोषित केला आहे. श्रीलंकेत स्फोट घडवणारे अतिरेकी भारतामार्गे पलायन करू नयेत म्हणून नौदलाची जहाजं आणि डॉर्नियर विमानं सागरी सीमांवर तैनात करण्यात आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

First published: April 22, 2019, 5:54 PM IST
Tags: shrilanka

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading