• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कर्नाटकनंतर मध्य प्रदेशात देखील सरकार धोक्यात? काँग्रेस आमदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा!

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशात देखील सरकार धोक्यात? काँग्रेस आमदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा!

Madhya Pradesh Government : कर्नाटकनंतर आता भाजपनं मध्य प्रदेशमध्ये देखील Operation Lotus सुरू केल्याची चर्चा आहे.

 • Share this:
  भोपाळ, 07 जुलै : कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकारचं भवितव्य धोक्यात असताना आता भाजप आणखी एक राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये 14 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी हरियाणातील गुरूग्राम येथे बोलत असताना शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण, आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं विधान केलं आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपच्या हा पराभव जिव्हारी लागला. त्यावेळी देखील शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस सरकार 5 वर्षे टीकणार नाही असा दावा केला होता. आम्हाला काँग्रेस सरकार पाडण्याची गरज नाही. काँग्रेस आपसातील कलहामुळे सरकार पाडेल असं चौहान यांनी म्हटलं होतं. पण, आता शिवराज सिंह चौहान यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसला धक्का; राहुल गांधींनंतर या बड्या नेत्याचा राजीनामा सपा, बसपाच्या मदतीनं केलं सरकार स्थापन राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं भाजपला पराभवाची धुळ चारत सरकार स्थापन केलं. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांपैकी भाजपला 109 जागा जिंकता आल्या तर काँग्रेसनं 114 जागा जिंकल्या. बसपानं 2, सपानं 1 आणि अपक्ष 4 जागांवर विजयी झाले. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार सध्या सपा, बसपा आणि अपक्षांच्या आधारावर आहे. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. VIDEO: पहिल्या पावसानंतर पुण्यातील रस्त्याची चाळण
  Published by:ram deshpande
  First published: