मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेसमध्ये अजूनही धुसफूस सुरूच? पक्षाध्यक्षपदाची निवडणूक जूनपर्यंत पुढे ढकलली

काँग्रेसमध्ये अजूनही धुसफूस सुरूच? पक्षाध्यक्षपदाची निवडणूक जूनपर्यंत पुढे ढकलली

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि धुसफूस सुरूच असल्याचं चित्र शुक्रवारच्या कार्यकारीच्या बैठकीत स्पष्ट झालं.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि धुसफूस सुरूच असल्याचं चित्र शुक्रवारच्या कार्यकारीच्या बैठकीत स्पष्ट झालं.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि धुसफूस सुरूच असल्याचं चित्र शुक्रवारच्या कार्यकारीच्या बैठकीत स्पष्ट झालं.

  नवी दिल्ली, 22 जानेवारी: काँग्रेसच्या अंतरिम पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच जूनपर्यंत पक्षप्रमुखपदी असतील, असं पक्षाच्या कार्यकारिणीने ठरवलं आहे. शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणीची (Congress Working Committee) बैठक झाली, त्या वेळी दोन गटांत मोठी वादावादी झाल्याचं वृत्त आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पक्षात अशी धुसफूस असणं हे योग्य नाही. तुमचा सोनिया गांधींवर विश्वास नाही का, असा थेट सवाल ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विचारला, असेही CWC बद्दलचे अपडेट्स मिळाले आहेत.

  काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत दोन गटांमधले तट उघड झाले. एका गटाने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा धोशा लावला होता. पण अखेर विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत सोनिया यांनाच पक्षाचं नेतृत्व देण्याचा निर्णय अंतिम ठरला.

  गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक आणि पी. चिदंबरम या ज्येष्ठ नेत्यांसह काही अन्य नेत्यांनी लवकरात लवकर पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी असं मत व्यक्त केलं. काँग्रेस पक्षाध्यक्षांना 'लेटर बाँब' टाकणाऱ्यांमध्ये यातलेच काही नेते होते. याउलट अशोक गेहलोट, ए. के. अँटनी आणि अमरिंदर सिंग यांच्या सारख्या सोनिया यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकांनंतर पक्षाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव मांडला. बैठकीत एक वेळ तर अशी आली की, अशोक गेहलोत यांनी चिडून विचारलं, 'सोनियांच्या नेतृत्वावर तुमचा विश्वास नाही का?'

  वोकसभा निवडणुकीत पक्षाला दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यानंतर ऑगस्ट 2019 पासून सोनिया गांधी यांची अंतरिम पक्षाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. लवकरात लवकर काँग्रेस कार्यकारिणीने नवा अध्यक्ष ठरवावा, अशी मागणी तेव्हापासून होते आहे. स्वतः सोनिया गांधीसुद्धा हेच सांगत आहेत. पण अद्याप काँग्रेसचे पक्षनेतृत्वाचे घोळ आणि अंतर्गत वाद अद्याप संपताना दिसत नाहीत.

  First published:

  Tags: Congress, Sonia gandhi