CAA वरून महाआघाडीत फूट, विरोधकांच्या बैठकीआधी शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

CAA वरून महाआघाडीत फूट, विरोधकांच्या बैठकीआधी शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

काँग्रेसनं सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली CAA लागू करण्यापासून मोदी सरकारला रोखण्यासाठी रणनिती तयार करण्यासाठी दुपारनंतर बैठक बोलावली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात सोमवारी दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. काँग्रेसनं CAA लागू करण्यापासून रोखण्यासाठी रणनिती तयार करण्यासाठी दुपारनंतर बैठक बोलावली आहे. सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनीही बैठकीला उपस्थित राहणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यानतंर आम आदमी पक्षानेही बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात आघाडीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेकडूनसुद्धा या बैठकीकडे पाठ फिरवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेला बैठकीचे निमंत्रण दिलं नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच शिवसेनेकडून कोणीही दिल्लीतील बैठकीला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.

समान विचारांच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सीएए आणि एनआरसी मुद्यावर सविस्तर चर्चा होऊ शकते. नागरिकत्व कायदा लागू होण्यापासून रोखण्यासाठीच्या रणनितीवर विचार केला जाईल. याशिवाय विरोधक मोदी सरकारला संसदेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात घेरण्याबाबतही चर्चा करतील. या बैठकीनंतर काँग्रेस त्यांच्या जनसंपर्क मोहिमेचे स्वरूप जाहीर करू शकते.

शिवसेना मोदींना म्हणते... ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्याचा हा आहे उत्तम मार्ग!

दरम्यान, ममता बॅनर्जींनी आरोप केला आहे की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि कट्टर पंथी खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत. यामुळे आता स्वत:च्या जीवावर सीएए आणि एनआरसीचा विरोध करणार आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ममत बॅनर्जींना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं होतं पण येणं, न येणं त्यांच्यावर अवलंबून आहे असं म्हटलं होतं.

बसपा सुप्रिमो मायावती या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याने काँग्रेससोबत मतभेद असल्याचं म्हटलं जात आहे. बसपा या बैठकीत त्यांचा प्रतिनिधीही पाठवणार नसल्याचं समजते.

नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, उदयनराजेंनी दिली ही प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading