S M L

कर्नाटकसाठी काँग्रेसचा प्लॅन बी तयार, घेणार सुप्रीम कोर्टात धाव

आज दुपारी राज्यपाल वाला यांनी जर भाजपच्या येडियुरप्पांना सरकार स्थापन करायचं निमंत्रण दिलं, तर काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2018 03:17 PM IST

कर्नाटकसाठी काँग्रेसचा प्लॅन बी तयार, घेणार सुप्रीम कोर्टात धाव

बंगळुरू, 16 मे : काँग्रेसचे सिद्धरामय्या पुन्हा राज्यपालांना भेटण्यासाठी निघालेत. काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेची संधी राज्यपालांनी दिली नाही, तर काँग्रेसचा प्लॅन बी तयार आहे. आज दुपारी राज्यपाल वाला यांनी जर भाजपच्या येडियुरप्पांना सरकार स्थापन करायचं निमंत्रण दिलं, तर काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

काँग्रेस नेते आणि सुप्रीम कोर्टातले वकील अभिषेक मनु सिंघवी काँग्रेसची बाजू मांडतील. काँग्रेस आणि जेडीयूमध्ये युती करण्याबाबत समझोता झालाय. त्यामुळे येडियुरप्पांना निमंत्रण देणं योग्य नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे.

काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. तर येडियुरप्पा यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केलाय. आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close