अखेर मुहूर्त ठरला! काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची आज 9 वाजता होणार घोषणा

अखेर मुहूर्त ठरला! काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची आज 9 वाजता होणार घोषणा

लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्त आहे. अध्यक्षपदाच्या नेमणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत अनेकदा बैठका घेतल्या. पण कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. आजही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर आज रात्री 9 वाजेपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होईल, अशी माहिती काँग्रेसच्या अधिर रंजन चौधरी यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत आलं. पण कोणत्याही नावावर संमती होऊ शकली नाही. या विलंबामुळे काँग्रेसवर मोठी टीकाही झाली. त्यानंतर आता अखेर काँग्रेसला नवं नेतृत्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्णयप्रक्रियेत नसणार

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या काँग्रेसच्या बैठकीतून सोनिया गांधी अर्ध्यातूनच बाहेर पडल्या. याबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, 'काँग्रेस अध्यक्ष ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण यामध्ये मी आणि राहुल गांधी सहभागी असणार नाही.'

अनेकांच्या नावाची चर्चा, कुणाच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक गहलोत, सचिन पायलट अशी अनेक नाव समोर आली आहेत. त्यामुळे ही जबाबदारी नेमकी कुणाकडे दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Congress
First Published: Aug 10, 2019 02:43 PM IST

ताज्या बातम्या