महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लवकरच - खर्गे

महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लवकरच - खर्गे

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची लवकरच यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

दिल्ली, 8 मार्च : लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसनं उत्तर प्रदेशातील 11 तर गुजरातमधील 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर देखील महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांबद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. यावर चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण, संजय निरूपम, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अविनाश पांडे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा केली. यानंतर बोलताना जवळपास बहुतांश जागांचा निर्णय झाला आहे. चर्चेचा अजून एक टप्पा बाकी असून उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती खर्गे यांनी दिली.

लोकसभेकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला, पण, दोन्ही पक्षांमध्ये अद्याप औरंगाबाद आणि नगरच्या जागेवर एकमत होताना दिसत नाही. नगरमधून सुजय विखे - पाटील लढण्यासाठी इच्छूक असून त्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

नगर, औरंगाबादवर तिढा

लोकसभा निवडणुकीसाठी काँँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडीचा निर्णय घेतला. पण, अद्याप देखील दोन्ही पक्षांमधील नगर आणि औरंगाबादच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. त्याच पार्श्वभूमिवर दिल्लीतील बैठकीमध्ये तोगडा निघण्याची शक्यता आहे.

काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरची जागा मागितली आहे. राधाकृष्ण विखे - पाटील यांचे पुत्र सुजय विखे - पाटील नगरच्या जागेवरून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. पण, राष्ट्रवादी मात्र नगरची जागा सोडण्यासाठी उत्सुक नाही.

विखे - पाटलांनी चाचपला भाजपचा पर्याय?

दरम्यान, सुजय विखे - पाटील यांनी नगरच्या जागेसाठी भाजप प्रवेशाचा पर्याय देखील चाचपून पाहिल्याचं बोललं जात आहे. तर, शरद पवार यांनी सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावं असा पर्याय देखील दिला होता. पण, अद्याप या जागेवर काहीही तोडगा निघालेला नाही.

AIR SRTIKE : नरेंद्र मोदींबद्दल काय म्हणाले अण्णा हजारे ? पाहा VIDEO

First published: March 8, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading