S M L

आरएसएसमध्ये कधी महिलांना शाॅर्टसवर पाहिलंय का ?-राहुल गांधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात किती महिला आहेत. कधी कोणत्या शाखेत महिलांना शाॅर्टसमध्ये पाहिलंय का ? मी तर नाही पाहिलं अशी टीका राहुल गांधींनी केली.

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2017 05:07 PM IST

आरएसएसमध्ये कधी महिलांना शाॅर्टसवर पाहिलंय का ?-राहुल गांधी

10 आॅक्टोबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातच्या दौऱ्यावर दुसऱ्या दिवशी संघावर निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात किती महिला आहेत. कधी कोणत्या शाखेत महिलांना शाॅर्टसमध्ये पाहिलंय का ? मी तर नाही पाहिलं अशी टीका राहुल गांधींनी केली.

राहुल गांधी यांनी भाजपच्या विचारधारेवर टीका केलीये. भाजपची विचारसरणी अशी आहे की महिलांनी काही बोलू नये, पण जेव्हा एखादी महिला बोलते तर तीला शांत राहण्यासाठी दबाव टाकला जातो असा आरोपही राहुल गांधींनी केला.

जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये सेल्फी काढतात तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं. पण हे मोबाईल चीनच्या तरुणांना नोकरीची संधी देतायत. हे मोबाईल चीनमध्ये तयार होतात. पण मोदी सरकारचं लक्ष्य हो नोकऱ्यांवर नाही अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close