S M L

काँग्रेसच श्रीदेवीच्या निधनावरच ट्विट झालं ट्रोल ;अखेर केला डिलीट

काँग्रेसनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “श्रीदेवींच्या निधनाच्या वृत्ताने आम्ही सर्वच दु:खी आहोत. त्या सर्वोत्तम अभिनेत्री होत्या. त्यांच्या अभिनयामुळे आजही त्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. त्यांना 2013 मध्ये यूपीए सरकारच्या काळात पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.”

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 25, 2018 06:10 PM IST

काँग्रेसच श्रीदेवीच्या निधनावरच ट्विट झालं ट्रोल ;अखेर केला डिलीट

25 फेब्रुवारी :  हवाहवाई गाण्यातून घरोघरी पोचणाऱ्या श्रीदेवींचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली.  यातील काँग्रेस पक्षाचा  शोकसंदेश ट्विटरवर ट्रोल झाला आहे.

काँग्रेसनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “श्रीदेवींच्या निधनाच्या वृत्ताने आम्ही सर्वच दु:खी आहोत. त्या सर्वोत्तम अभिनेत्री होत्या. त्यांच्या अभिनयामुळे आजही त्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. त्यांना 2013 मध्ये यूपीए सरकारच्या काळात पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.” 

या ट्विटमधील शेवटच्या वाक्यावर अनेकांनी आक्षेप घेतले. तुम्ही पद्मश्री दिलं होतं म्हणजे काय? य़ावर राजकारण करू नका. मोठे व्हा अशाप्रकारच्या टीका ट्विटरवर करण्यत आला.काँग्रेसने लोकांची माफीही मागितली  आणि अखेर काँग्रेसला हा ट्विट डिलीट करावा लागला.

Loading...
Loading...

तसंच राहुल गांधींनी देखील ट्विट करून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2018 06:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close