काँग्रेसने दिलीत राहुल गांधींच्या 'सेंट्रल हॉल'मध्ये फोन पाहण्याची कारणं

काँग्रेसने दिलीत राहुल गांधींच्या 'सेंट्रल हॉल'मध्ये फोन पाहण्याची कारणं

'राहुल गांधींचा राष्ट्रपतींचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. त्यांना जेवढं ऐकायचं होतं तेवढं त्यांनी ऐकलं.'

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान फोन पाहण्याच्या कृतीचं काँग्रेसने समर्थन केलंय. राष्ट्रपतींचं भाषण सुरू असताना राहुल हे सतत फोन बघत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोल झालेत. राहुल गांधींना गांभार्य नाही अशी टीका होऊ लागली. या टीकेला काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी उत्तर दिलंय. या उत्तरावरून राहुल गांधी यांच्यावर आणखी टीका होण्याचीच शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

आनंद शर्मा म्हणाले, राष्ट्रपतींचं अभिभाषण नीट ऐकू येत नव्हतं, भाषण शुद्ध हिंदीत असल्याने त्यातले अनेक शब्द कळत नव्हते, त्यामुळे राहुल गांधी हे फोन बघत असावेत. त्यात राष्ट्रपतींचा अनादर करण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांना जेवढं ऐकायचं होतं तेवढं त्यांनी ऐकलं, असंही त्यांनी सांगितलं.

संसदेचं अधिवेशन सुरू होताना संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला वेगळं महत्त्व असतं. सरकारच्या धोरणांची रुपरेषा राष्ट्रपतींच्या अभिभाषणामधून मांडली जाते. या भाषणावर दोनही सभागृहात चर्चा होते. विरोधीपक्ष त्यावरून सरकारवर टीका करतात आणि सरकारही त्या टीकेला उत्तर देतं. त्यामुळे हे भाषण महत्त्वाचं समजलं जातं.

राहुल गांधींना गांभीर्य नाही अशी टीका भाजपकडून कायम केली जाते. त्यामुळे या व्हिडीओवरही भाजपकडून टीका होऊ लागली. त्याला काँग्रेसने अशा प्रकारचं उत्तर दिल्याने ही टीका आणखी वाढण्याचीच शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

अध्यक्षपदासाठी या नेत्याचं नाव चर्चेत

लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी परिवारातील नसणार हे विशेष ! राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे अध्यक्षपदाची कमान सोपावली जाणार आहे. मोठ्या काळानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी परिवाराबाहेरील व्यक्ती असणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांचं नाव देखील यासाठी चर्चेत होतं. पण, आता अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसकडून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास का? असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे. त्याला कारणं देखील तशीच आहेत.

वर्षभराची कामगिरी

मागील वर्षभरापासून अशोक गेहलोत यांची कामगिरी ही उत्तम राहिली आहे. राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा पराभव केला आणि सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं नसलं तरी भाजपला मात्र जोरदार टक्कर दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 09:07 PM IST

ताज्या बातम्या