काँग्रेस पक्षात गुंडांना प्राधान्य, प्रियंका चतुर्वेदींचा पक्षाला घरचा आहेर!

काँग्रेस पक्षात गुंडांना प्राधान्य, प्रियंका चतुर्वेदींचा पक्षाला घरचा आहेर!

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल: काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. उत्तर प्रदेशमधील काही नेत्यांना पक्षात स्थान दिल्यामुळे प्रियंका नाराज झाल्या आहेत. मथुरा येथे प्रियंका यांच्याबरोबर गैरवर्तन केल्यामुळे पक्षाने काही नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. पण त्यानंतर या सर्व नेत्यांना पुन्हा एकदा पक्षात घेण्यात आले आहे.

या प्रकरणावर प्रियंका यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटवर एकापाठोपाठ एक ट्विट करत प्रियंका यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका होत असताना खुद्द राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका यांनी केलेल्या टीकेची जोरदार चर्चा सुरु आहे.

ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी रक्त आटवले, घाम गाळला त्यांच्याऐवजी पक्षात आता गुंडांना प्रधान्य दिले जात आहे. मी पक्षासाठी दगड खाल्ले, अपशब्द ऐकले पण ज्यांनी मला धमकावले त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही हा प्रकार दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे हे प्रकरण?

राफेल करारावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी मथुरेत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर संबंधित नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर या नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले आहे. प्रियंका यांनी पक्षाला लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे.

जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...

First published: April 17, 2019, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading