काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते राजीव त्यागी यांचा अकस्मात मृत्यू; हृदयविकाराचा झटका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते राजीव त्यागी यांचा अकस्मात मृत्यू; हृदयविकाराचा झटका

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे (Congress leader died) प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते राजीव त्यागी (Rajiv tyagi) यांचं बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते राजीव त्यागी यांचं बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अगदी संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे कामात व्यग्र असणाऱ्या त्यागींना अचानकच अस्वस्थ वाटू लागलं आणि हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.

बुधवारी संध्याकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. पण रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं वृत्त आहे. अगदी संध्याकाळपर्यंत ते कार्यरत होते. एका टीव्ही चॅनेलच्या शोमध्ये चर्चेत काँग्रेसची बाजू मांडायला ते तयार होते. त्याबद्दल त्यांनी केलेलं Tweet च शेवटचं ठरलं.

राजीव त्यागी यांच्या अचानक जाण्याने आम्हाला प्रचंड दुःख झालं आहे. ते कट्टर काँग्रेसी आणि सच्चे देशभक्त होते. त्यागींच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं Tweet काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 12, 2020, 8:22 PM IST
Tags: Congress

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading