रविवारपासून अमित शहा कुठे होते? दिल्लीतल्या हिंसाचारावरून सोनियांचा हल्लाबोल

रविवारपासून अमित शहा कुठे होते? दिल्लीतल्या हिंसाचारावरून सोनियांचा हल्लाबोल

'भाजपच्या अनेक नेत्यांनी चिथावणीखोर भाषणं देऊन भीती आणि व्देषाचं वातावरण निर्माण केलं होतं.'

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी :  दिल्लीतल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असून भाजपच त्याला जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेसच्या कार्यसमितीची आज बैठक झाली आणि त्यात दिल्लीतल्या हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हा मोठा हल्ला केला. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकलेला असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या काही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच हा हिंसाचार भडकला असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान गेली तीन दिवस कुठे होते असा सवालही त्यांनी केला. दिल्ली सरकारलाही परिस्थिती नियंत्रण आणण्यास अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं. अमित शहा यांनी जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपच्या अनेक नेत्यांनी चिथावणीखोर भाषणं देऊन भीती आणि व्देषाचं वातावरण निर्माण केलं होतं. भाजपच्या एका नेत्याने तर दिल्ली पोलिसांना तीन दिवसांची मुदत दिली होती. तीन दिवसानंतर आम्ही जबाबदार राहणार नाही असंही त्याने सांगितलं होतं. गेल्या 72 तासांपासून दिल्ली पेटलेली असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काहीही केलं नाही. त्यामुळे 20 लोकांचा जीव गेला असा आरोपही त्यांनी केला.

First published: February 26, 2020, 1:29 PM IST

ताज्या बातम्या