पंतप्रधानांबाबतच्या वक्तव्यावर शशी थरूर यांचा यू-टर्न, चुकलो असल्याचं केलं मान्य

पंतप्रधानांबाबतच्या वक्तव्यावर शशी थरूर यांचा यू-टर्न, चुकलो असल्याचं केलं मान्य

बांग्लादेशच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी पंतप्रधानांनी (Narendra Modi) बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्यावर भाषण दिलं आहे. त्यांच्या या भाषणानंतर काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharur) यांनी घाईघाईत ट्वीट केलं होतं. ज्यामुळे त्यांना आता माफी मागावी लागली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर (Tour of Bangladesh) आहेत. बांग्लादेशच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी पंतप्रधानांनी बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्यावर भाषण दिलं आहे. ते शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ढाका येथील एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या भाषणानंतर काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharur) यांनी घाईघाईत ट्वीट केलं होतं. ज्यामुळे आपण चुकलो असं त्यांनी मान्य केलं आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शनिवारी नरेंद्र मोदींचं भाषण शेअर करताना लिहिलं की, 'जर माझं चुकलं असेल तर ती चूक स्वीकारण्यात मला अजिबात वाईट वाटत नाही. काल मी घाईघाईने बातम्यांचे मथळे आणि ट्वीट वाचून एक ट्विट केलं होतं की,  'सर्वांना माहित आहे बांग्लादेशला कोणी मुक्त केलं'. याचा अर्थ असा होता की, नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधी यांचं योगदान नाकारलं आहे. पण मोदींनी ते नमूद केलं होतं. चुकीसाठी क्षमस्व'

काय म्हणाले पीएम मोदी

बांग्लादेशमध्ये केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, 'बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणं ही माझ्या जीवनातील पहिल्या काही चळवळींपैकी एक होती. मी साधारणतः 20-22 वर्षांचा होतो, तेव्हा मी आणि माझ्या बऱ्याच साथीदारांनी बांग्लादेशातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता.

हे ही वाचा -पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला बांगलादेशात का होतोय विरोध? चौघांचा मृत्यू

शशी थरूर यांचं संबंधित ट्विट

पंतप्रधानांच्या भाषणानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विट केलं होतं. ते यावेळी म्हणाले की, 'आपले पंतप्रधान बांग्लादेशातील लोकांना भारतीय बनावट बातम्याची मेजवानी देत आहे. बांग्लादेशला कोणी मुक्त केलं हे सर्वांना ठाऊक आहे.

Published by: News18 Desk
First published: March 27, 2021, 1:38 PM IST

ताज्या बातम्या