News18 Lokmat

राजस्थानमध्ये काँग्रेसचे शतक; भाजपच्या हिंदुत्व कार्डला धक्का

News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2019 01:39 PM IST

राजस्थानमध्ये काँग्रेसचे शतक; भाजपच्या हिंदुत्व कार्डला धक्का

नवी दिल्ली, 31 जानेवारी: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. या पोटनिवडणुकीतील भाजपचा पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण मॉब लिंचिंग, गो तस्करी आणि गो रक्षक यांच्यातील वाद यामुळे रामगड चर्चेत होते. रकबर खान यांना रामगड येथे जमावाने मारहाण करून ठार केले होते. त्यामुळे भाजपचे हिंदुत्व कार्ड चालेल की नाही हे या निकालातून स्पष्ट होणार होते. तर अशोक गहलोत मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे गहलोत आणि काँग्रेस पहिल्या टेस्टमध्ये पास होतो का याकडे सर्वांचे लक्ष होते.

निवडणुकीत काँग्रेसच्या साफिया खान यांनी 12 हजार 228 मतांनी विजय मिळवला. खान यांनी भाजपच्या सुखवंत सिंह यांचा पराभव केला. खान यांनी 83 हजार 311 तर सिंग यांनी 71 हजार 083 मते मिळाली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 199 पैकी 99 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रीय लोकदलाच्या एका सदस्यांने पाठिंबा दिला त्यामुळे काँग्रेस सरकार बहुमतात आले होते. आता या विजयामुळे काँग्रेसने सभागृहात स्वबळावर 100 हा बहुमताचा आकडा गाठला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे येथील निवडणूक स्थगित करण्यात आली होती.


VIDEO : जेव्हा अजितदादा 12 कोटींच्या रेड्याचा किस्सा सांगता

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...