• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • यंत्रणांच्या डोळ्यांदेखत चालणाऱ्या ड्रग्ज तस्करीला कुणाला आशीर्वाद? काँग्रेसचा सरकारवर घणाघात

यंत्रणांच्या डोळ्यांदेखत चालणाऱ्या ड्रग्ज तस्करीला कुणाला आशीर्वाद? काँग्रेसचा सरकारवर घणाघात

गुजरातमध्ये कुणाच्या आशीर्वादाने अंमली पदार्थांची तस्करी (Congress raises the issue of massive heroine haul at Mundra port in Gujarat) सुरु आहे, असा सवाल करत काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : गुजरातमध्ये कुणाच्या आशीर्वादाने अंमली पदार्थांची तस्करी (Congress raises the issue of massive heroine haul at Mundra port in Gujarat) सुरु आहे, असा सवाल करत काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरात कोट्यवधी रुपयांचं हेरॉईन (massive drug haul at the Gujarat port) जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग्ज कुठून आले आणि या गोरखधंद्यामागे नेमका कुणाचा हात आहे, याचं उत्तर देण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. काय आहे प्रकरण? गुजरातच्या मुंद्रा बंदरावर अंमली पदार्थांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या बंदरावर तस्करीसाठी येत असलेलं तब्बल 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. या तस्करीला वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा जबाबदार असून त्यांचा तस्करीच्या या धंद्यात सहभाग असल्याचा संशय सुरजेवाला यांनी व्यक्त केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, ईडी आणि डीआरआयसारख्या संस्था असताना असे प्रकार कसे घडता, असा सवाल काँग्रेसनं केला आहे. ड्रग्जमुळे तरुणाईला धोका ड्रग्जमुळे तरुण पिढी बरबाद होत असून नुकतेच दिल्लीमध्येही 354 किलो ड्रग्ज सापडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या ड्रग्जची किंमत 2500 कोटीपेक्षा अधिक होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतात ड्रग्ज कसे येत आहेत आणि त्यांचं वितरण कसं होत आहे, याचं उत्तर तपास यंत्रणांनी द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे वाचा - TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही चौकशी का नाही? अदानी मुंद्रा पोर्टवर एवढ्या प्रमाणात ड्रग्ज सापडूनदेखील त्याविरोधात कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशीदेखील न झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट तालिबानपर्यंत पोहोचत असल्याचं सांगत सरकार राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.
  Published by:desk news
  First published: